spot_img
spot_img

बाबुजी आव्हाड महाविद्यालय उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित

पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर) :- येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहिल्यानगर क्रीडा विभागाच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुदाम शेळके यांच्या शुभहस्ते व अहिल्यानगर क्रीडा विभाग अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, सचिव डॉ. राजेंद्र देवकाते, सिनेट सदस्य डॉ. रमेश गायकवाड, प्राचार्य संजय सागडे, व इतर मान्यवरांच्या उपस्थित न्यू आर्ट्स महाविद्यालय, अहिल्यानगर या ठिकाणी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अरुण राख, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अशोक डोळस व प्रा. ब्रह्मानंद दराडे उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध क्रीडाप्रकारात जास्तीत जास्त खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग आणि पदके मिळवल्याबद्दल गुणांकन करून सदर पुरस्कार जाहीर केला जातो.
गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग हब म्हणून पाथर्डी मधील बाबुजी आव्हाड महाविद्यालय नावारुपास आले आहे. मागील वीस वर्षात ५० पेक्षा जास्त राष्ट्रीय वेटलिफ्टर व पॉवर लिफ्टर तसेच अनेक राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडविण्याचे कार्य पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. बबन चौरे तसेच क्रीडा संचालक डॉ. विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत चालू आहे.
या दोन्ही खेळाचे टॅलेंट पाथर्डीमध्ये शोधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने केले आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ,राज्य, राष्ट्रीय, खेलो इंडिया तसेच नॅशनल गेम्स अशा विविध स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्राला अनेक पदके बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवून दिली आहेत. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार व जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे चार पुरस्कार वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारा मध्ये महाविद्यालयास मिळाले आहे. याचाच परिपाक म्हणजे २०२४-२५ चा क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा पुरस्काराने महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख यांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!