कडा (प्रतिनिधी) :- भारत हा कृषीप्रधान देश आहे युवकांनी शेतीबरोबरच वेगवेगळ्या व्यावसायाकडे वळावे. अलीकडच्या काळात शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात देखील व्यावसाय सुरू होत आहेत, हि कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे केले.
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील प्रा. अशोक राऊत यांनी सुरू केलेल्या आदिनाथ कलेक्शन अँड मोबाईल शॉपीचे उद्घाटन माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते व नांदूर विठ्ठलाचे ह.भ.प. नामदेव महाराज विधाते (शास्त्री) यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,सरपंच माऊली वाघ, माजी जि.प.सदस्य हरिभाऊ तांदळे, नवनाथ तांदळे, रावसाहेब शिरसाट,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते,सरपंच मोहन आमटे, सरपंच पोपट शेकडे, सरपंच प्रल्हाद मुळीक, सरपंच बापुसाहेब पठारे,पं.स. माजी सदस्य अमोल चौधरी,उपसरपंच परमेश्वर कर्डिले व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, राऊत यांनी शहरांप्रमाणे ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे कापड दुकान सुरू केले ही चांगली गोष्ट आहे. वेशभूषा चांगली असल्यास समाजात मानसन्मान मिळतो. अनेकांना आपापल्या व्यवसायानुसार गणवेश वापरावा लागतो. कापड दुकान हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करणारा आहे.
राज्यात दिवसेंदिवस कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. गोरगरिबांना शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी आष्टी येथे हि सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.येत्या दिड ते दोन वर्षांत आष्टी येथे ५०० बेडचे कॅन्सर हाॅस्पिटल सुरू करणार आहे. आष्टी येथे सर्वच प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत. मतदारसंघातील ४० हजार विद्यार्थी आपल्या संस्थेच्या शाळेत शिक्षण घेतात.
भविष्यात उर्वरित शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. नवनविन शिक्षण आष्टी येथे सुरू केले जाईल. यंदा आपल्याकडे बरा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना हळूहळू चांगले दिवस येऊ लागले आहेत.
याप्रसंगी ह.भ.प. विधाते महाराज यांनी सांगितले की, कितीही धन कमावले तरी सुख मिळत नाही. कमावलेले धन काही प्रमाणात समाज कार्यासाठी खर्च केल्यास मानसिक समाधान मिळते.
कार्यक्रमास हरिश्चंद्र बोडखे, गोकुळ लोखंडे, बाळासाहेब शेकडे, अशोक वायभासे,
बबनराव तळेकर, संदीप शिंदे, खाडे, भगवान तळेकर, मच्छिंद्र मुळीक, किसनराव आमटे, महादेव वायभासे, अंकुश तळेकर, मुरलीधर शेकडे, मुख्याध्यापक तरटे, सरपंच भरत जाधव,बबनराव रांजणे, पोपटराव पोटे यांच्यासह घाटा पिंपरी, देवळाली, लोखंड वाडी परिसरातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचलन तळेकर यांनी केले.
उपस्थितांचे आभार प्रा. अशोक राऊत यांनी मानले.