spot_img
spot_img

प्रत्यक्ष पाणी मेहकरी धरणात पोहोचताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून जलपूजन,आ.धस यांचे मानले आभार ********************************** आमदार सुरेश धस यांच्या पाठपुरावाला यश

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येताना दिसत आहे. आमदार सुरेश धस यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मेहकरी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आज सकाळी ९.४५ वा.सीना मध्यम प्रकल्पातून दोन्ही पंपाद्वारे सुमारे १६० क्यूसेक पाणी सोडले गेले असता प्रत्यक्ष पाणी मेहकरी मध्यम प्रकल्पात पोहोचताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी जलपूजन करून आनंद व्यक्त करत आ.सुरेश धस यांचे आभार मानले.
यंदा सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असुन परिणामी अतिरिक्त पाणी नदीद्वारे वाहून जात होते.या पार्श्वभूमीवर आष्टी मतदारसंघाला या पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी आमदार धस यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यास प्रतिसाद देत प्रशासनाने तातडीने आवश्यक तांत्रिक प्रक्रिया व दुरुस्ती पूर्ण करून याशिवाय थकीत असलेले ३६ लाख ८४ हजार रुपयांचे वीजबिलही भरले गेले. मेहकरी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गुरुवारी दि.२१ ऑगस्ट रोजी
प्रत्यक्ष पाणी मेहकरी मध्यम प्रकल्पात पोहोचताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला.
या संपूर्ण प्रक्रियेत पुणे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ गुनाळे,कार्यकारी अभियंता धाराशिव मध्यम प्रकल्प विभाग,धाराशिव, कार्यकारी अभियंता उजनी जलविद्युत विभाग, इंदापूर, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, बीड, कार्यकारी अभियंता सीना मध्यम प्रकल्प, उपकार्यकारी अभियंता पालवनकर, उपअभियंता आडे तसेच विद्युत व यांत्रिकीकरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. आ.सुरेश धस यांचे परिसरातील ग्रामस्थांकडून आभार मानत समाधान व्यक्त केले.
यावेळी नवनाथ जगताप,कानडी खु.सरपंच
कारभारी गव्हाणे,घोंगडे वाडी सरपंच भाऊसाहेब घोडके,उपसरपंच बश्री अशोक खराडे,पंडित पोकळे,गणप्रमुख राहुल सुरवसे गणप्रमुख अतुल खराडे,सीताराम झांजे,संजय माळशिखरे, दत्तोबा घोडके, शेख खाजा, अजिनाथ गावडे अनिल माळशिखरे, यांच्यासह कानडी खुर्द पिंपळगाव दाणी, मेहेकरी, पुंडी, वाहिरा येथील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते जलपूजन करून फुले व श्रीफळ अर्पण करून आनंद साजरा करण्यात आला.

➡️ शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाने समाधान
– आ.सुरेश धस
*************
“या पाण्यामुळे मेहकरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल आणि स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे समाधान मला आहे.
समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नावर मी सातत्याने ठामपणे उभा आहे. मी मतदार संघातील शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!