आष्टी (प्रतिनिधी) मंगळावर दिनांक 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने तब्बल 12 फुटी महाकाय कॅमेऱ्याचे पूजन करून जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात येतो.यंदा 12 फूट उंचीच्या कॅमेराची प्रतिकृती साकारून तालुक्यातील शंभरहून अधिक फोटोग्राफर बांधवांच्या तसेच युवा नेतृत्व जयदत्त धस यांच्या उपस्थितीत हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला.यावेळी आधुनिक काळासोबत नवनवीन तंत्रज्ञानांची जोड देऊन या व्यवसायाने भरारी घेतली असून यामध्ये आता स्पेशलायझेशन देखील झाल्याने ज्याच्या नजरेची तीक्षता आणि बौद्धिक कल्पकता आहे असाच फोटोग्राफर तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो.शिवाय आपल्या आयुष्यातील क्षण साठवून ठेवण्याचं काम आपण करत असतो त्यामुळे सर्वांनी या कलेला व्यावसायिक रूप न देता कलेप्रती आदर दाखवून ही कला जोपासली तर आपली आर्थिक उन्नती देखील आपोआप होत राहते असे मत सर्व उपस्थित फोटोग्राफर बांधवांनी व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील आजी माजी फोटोग्राफर, व्हिडिओग्रफार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.