कडा (प्रतिनिधी) येथे कुरडवाडी येथील प्रसिद्ध उद्योगपती शिवशताक्षी मसाल्याचे मॅनेजिंग डायरेक्टर शितल शेठ चिवटे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सर्व व्यापाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जैन श्रवक संघ कडाचे अध्यक्ष रतिलाल जी कटारिया. सामाजिक कार्यकर्ते तथा कडा शहराचे माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे. व्यापारी संघटनेचे सचिव नितीन शेठ शिंगवी, प्रकाशशेठ श्रीश्रीमाळ, रामशेठ ससाने, अमित शेठ राठोड, सचिन शेठ गांधी,सागरशेठ श्रीश्रीमाळ,संदीप शेठ चानोदीया, वसंत शेठ चोरबेले, गणेशशेठ कटारीया,आयुब मोमीन, नासिर पानसरे,निहाल शिंगवी,विनित शिंगवी,व शिवशतक्षी मसाल्याचे कंपनीचे प्रतिनिधी आर एस एम योगेश कुंभार सर व एक एस एम लींगेश्वर तकटे सर उपस्थित होते. यावेळी उद्योगपती शितल शेठ यांनी सांगितले की खूप कमी दिवसात आमचे कष्ट व व्यापाऱ्यांची व ग्राहकांची साथ या जोरावर बाजारपेठेत आम्ही यशाचे शिखर सर करत आहोत.तसेच त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना कुरूडवाडी येथे कंपनी व्हिजीट साठी येण्याचे निमंत्रण दिले.तर सर्व व्यापाऱ्यांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यानंतर त्यांनी कडा येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले यांच्या शिवनेरी पतसंस्था येथे भेट दिली. पतसंस्थेकडून त्यांचा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष नवनाथ दादा कर्डिले यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे अमोल कर्डिले व प्रशांत गिलचे उपस्थित होते.