spot_img
spot_img

खडकत ग्रामस्थांची पाण्यासाठी एकजूट;आ. सुरेश धस यांच्याकडून ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक

आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकत येथे दरवर्षी दिवाळीनंतर भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी दाखविलेली ऐक्यभावना आणि स्वयंस्फूर्तीचे प्रयत्न हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी आपल्या भेटी दरम्यान केले.
खडकत गाव हे सीना नदी शेजारी असूनही पावसाळ्यानंतर पाणी साठवणुकीची सोय नसल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. या प्रश्नाच्या मूळ उपाययोजनेसाठी शासनस्तरावर अंदाजपत्रक तयार झाले असले तरी खर्चाच्या प्रचंड आकारामुळे योजना अद्याप मंजूर होऊ शकली नाही. अशा कठीण परिस्थितीत गावातील सरपंच शांतीलाल काटे, गुलाब जेवे,बंटा जाधव,शिवाजी जेवे,अप्पासाहेब जाधव या ग्रामस्थांनी स्वखर्चाने नदीतील पाणी उचलून साठवण बंधाऱ्यात वळविण्याची तात्पुरती सोय केली.ग्रामस्थांच्या या लोकहितवादी उपक्रमाची शनिवारी आमदार सुरेश धस यांनी पाहणी करत विशेष कौतुक केले.मूळ योजना शासनाकडून मंजूर होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असून यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास आ.सुरेश धस यांनी ग्रामस्थांना दिला. यावेळी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ह.भ.प. जाधव महाराज, सभापती बद्रीनाथ जगताप, माजी सभापती दत्तात्रय जेवे, विजय भोस्टे, प्रा.तात्यासाहेब जेवे, संजय जेवे, दादासाहेब बळे,भीमराव बळे,विठ्ठल तोरणमाल सर यांच्यासह खडकत व बळेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➡️ आ.सुरेश धस यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी

मतदारसंघाचे लोकप्रिय आ.सुरेश धस आणि गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावतुन जात असलेल्या सीना नदीतुन एका पाझर तलावात दोन मोटारी टाकून पाणी उपसा केले. कमी खर्चात हा प्रयोग यशस्वी होत असुज.संपूर्ण गाव या उपक्रमामुळे बागायती होणार आहे.या उपक्रमामुळे खडकत गावचा पाणी टंचाई चा दरवर्षीचा मोठा प्रश्न मार्गी लागला असुन येणाऱ्या काळात असाच आणखी एक प्रयोग आम्ही करणार असून आ.सुरेश धस याची पाहणी करून याबाबत शासन दरबारी पाठपुरवा करून तात्काळ मार्ग काढू असे आश्वासन दिले असून यामुळे अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.ग्रामस्थांच्य आ. सुरेश धस यांचे आभार मानले जात आहे.

दत्तात्रय जेवे
माजी सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती कडा

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!