पुणे (प्रतिनिधी) आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील नागरीक पुणे शहरातील विविध भागात कामानिमित्त आलेल्या मतदारसंघ वासीयांचे आभार व्यक्त करण्यासाठी आ.सुरेश धस रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी येणार आहेत.या आभार दौऱ्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बंटी शेठ सगळे,बंडुसाहेब तोडकर,शहादेव चौधरी यांनी केले आहे.
मराठवाड्यातील आष्टी,पाटोदा, शिरूर मतदारसंघातील जनतेच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार सुरेश धस हे पुणे शहरातील चिंचवड येथे येत आहेत.रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा.आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात मतदारसंघातील विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षांबाबत चर्चा होईल.स्नेह मेळावा घेऊन आभार मानणार आहेत.
आ. सुरेश धस यांनी नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असून, त्यांच्या या भेटीमुळे पुण्यातील मराठवाड्याच्या जनतेशी त्यांचा संवाद अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे शहरात रहिवाशी असलेल्या सर्व जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
बंडुसाहेब तोडकर,शहादेवचौधरी, कुमार कोकणे,गणेश कदम ,वलवळे राजेंद्र, अनिल टेकाळे,बंटी सगळे, इंद्रजित पवार यांच्यासह पुणे शहरातील प्रमुखांच्यावतीने करण्यात येत आहे.