spot_img
spot_img

जाटदेवळे येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन संपन्न

पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर) :- जाटदेवळे गावातील अतिशय प्राचीन व सर्व हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून या जिर्णोद्धाराचा शुभारंभ व भूमिपूजन आज श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा ७५० व्या जन्मोत्सव, गोकुळाष्टमी व भारतीय स्वातंत्र्य दिन असा त्रिवेणी मुहूर्तावर व मंगलमय वातावरणात ह. भ.प. प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंदकाका जाटदेवळेकर, ह. भ.प. गोविंद महाराज शास्त्री जाटदेवळेकर, ह. भ.प. हरिओम महाराज पवार, तसेच गावातील ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधी व पौराहित्य उपस्थित ब्रम्हवृदांच्या हस्ते झाले.
यावेळी प.पूज्य मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे महत्त्व सांगत गावातील एकोपा व भक्तिभाव वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने व देणगीदारांच्या योगदानातून हा जीर्णोद्धार प्रकल्प हाती घेण्यात आला. या कामासाठी अवघ्या अर्ध्या तासामध्ये गावकऱ्यांनी अर्धा कोटी रक्कम जमा केली असून आणखी भरपूर प्रमाणात भक्त देणगीच्या व वर्गणीच्या माध्यमातून मदत करून मंदिर अतिशय भव्य व दिमाखदार अशा नव्या रूपात भक्तांच्या दर्शनासाठी लवकरच सज्ज होणार आहे.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ व श्रद्धावान भाविक उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!