spot_img
spot_img

देवीनिमगाव येथे कन्येचा वेलकम सोहळा थाटात! अनोख्या स्त्री जन्माच्या स्वागताने ग्रामस्थ सुखावले

आष्टी (प्रतिनिधी)
स्त्री हे क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते असे म्हणतात.घरादाराच्या सुखी,संस्कारसंपन्न कुटुंबात स्त्रीचे मौल्यवान योगदान असते परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे समाज रचनेत स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिही नकारात्मक राहिली परंतु आजही व्यवस्थेमध्ये असे अनेक कुटुंब आहेत की,जिथे स्त्रीला देवीचे रूप मानून सन्मान केला जातो.
असाच मनाला समाधान देणारा प्रकार काल रविवारी आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वाहेदभाई यांंच्या मुलाला मुलगी म्हणजे वाहेदभाईला नात झाली.शेख वाहेदभाई यांंच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्याने तिचे कुटुंबासह अनेक मित्रांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात चिमुकल्या मुलीचे स्वागत करण्यात आले.रविवारी या सुखद घटनेने आष्टीकरांना आनंद आणि हायसे वाटले.
आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते वाहेदभाई शेख यांची नात आणि आई शमाईला सोहेल (आई) तर शेख सोहेल (वडील) हे राहणार देवीनिमगाव येथील आहेत.यांची चार महिन्याची कन्या हिचा देवीनिमगाव येथे अत्यंत थाटामाटात वेलकम सोहळा रविवारी दुपारी संपन्न झाला. यानिमित्ताने स्त्री जन्माचे अनोखे स्वागत पाहताना उपस्थितांनाही काही वेळ गहिवरून आले.
वाहेदभाईंचे वडील शेख रसूलभाई यांना कन्या नव्हती आणि बहिण ही नव्हती.पर्यायाने अर्थातच वाहेदभाईला बहीण नाही.आजोबा झालेले वाहेदभाईला कुटुंबात पहिल्यांदा मुलगी झाल्याने प्रचंड आनंद झाला.वाहेदभाईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.मुलीच्या घरात प्रवेश होताच प्रचंड फटाक्याच्या अतिषबाजीत पेढे साखर आणि गोड वस्तूंनी सर्वांना वाटप करण्यात आले.या आनंदी घटनेचे अनेकांना साक्षीदार करण्यात या कुटुंबाला समाधान वाटले.या छोट्याखानी स्त्री जन्माच्या स्वागत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकबाल पेंटर होते. या सुखद सोहळ्याला शहाबुद्दीन सय्यद,वैष्णव शिंदे, सरपंच संदीप मार्केडे, संपतराव धोंडे,ह.भ.प. दिनकरराव तांदळे,
पत्रकार उत्तम बोडखे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिला.यावेळी आपल्या भाषणात एकबाल पेंटर म्हणाले,गरिबी आणि सुरक्षा हवी या कारणामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होत असल्याचे वास्तव आहे.उपमुख्यमंत्र्यांनी कन्येचे स्वागत करताना शासन ५ हजार रुपये देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे.आष्टी तालुक्यातील वाहेदभाईची नात ही पहिली लाभार्थी ठरू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बेटी बचाव बेटी पढाव,बेटीला संरक्षण आदी मूल्यात्मक बाबींना समोर घेत मुलींना उपस्थिती भत्ता शैक्षणिक भत्ता वाढ झाली पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केलेले आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दलित मित्र पुरस्कार विजेते इकबाल पेंटर,
दौलावडगावचे माजी सरपंच शेख मेहमूद,
अहमद भाई मोईनभाई ,
इरफानभाई,सय्यद,शहाबुद्दीन,ह.भ.प.दिनकरराव तांदळे, संपत धोंडे सर, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अहमदनगरचे अकबर शेठ,जब्बार भाई,सत्तारभाई, अन्सारभाई ,सायर पठाण ,महमूद सर,
पाटोदा येथील शेपूशेठ,
सुभाष पाखरे ,डॉ.साजिद सय्यद,ॲड.वहाब सय्यद ,शिरूर येथील गटशिक्षणाधिकारी शेख जमीर भाई,पत्रकार जावेद पठाण,
देवीनिमगावचे सरपंच संदीप मार्कंडे ,उपसरपंच काका ढवळे,चेअरमन रमेश गावडे,अमोल चाटे,
दिलीप खेंगरे ,छोटू सिंग परदेशी,बबन घोगंडे ,
माजी सरपंच बिट्टूनाना पोकळे,ॲड.मुन्नाभाई ,
सुभाष शिंदे सर ,भिगवन येथील रियाजभाई, पुणे येथील निसार शेख,
विशाल लाडाने पाटील,
राशीन येथील इमरान काजी आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णव शिंदे तर आभार माजी सरपंच ॲड.सय्यद वहाब पाटोदा यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!