कडा (प्रतिनिधी) लॉर्ड महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर इंग्लिश स्कूल कडा या सीबीएसई बोर्ड मान्यता प्राप्त शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. पांडुरंग गाडे यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रंगीत खडूच्या माध्यमातून उत्कृष्ट असे फलक लेखन करून *हर घर तिरंगा* हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी नेहमीच आपल्या कल्पक दृष्टिकोनातून दर्जेदार फलक लेखन करत असतात तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शाळेमध्ये विविध चित्रकला स्पर्धा,हस्ताक्षर सुधार स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, प्रदर्शने , एलिमेंटरी, इंटमिजिएट चित्रकला परीक्षांचे आयोजन करुन. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकले बद्दल आवड निर्माण करत असतात.