spot_img
spot_img

नभांगण फाऊंडेशन मुंबई विद्यमाने जि.प. पाचेगांव शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताविकरण ——————————————– परिसरातील ९५१ विद्यार्थाना करणार शालेय साहित्य वाटप

 

कडा (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील मोजे पाचेगाव या ठिकाणी दि १४ आँगस्ट २०२५ गुरुवार रोजी सकाळी १०वाजता जि.प. शाळा पाचेगांव येथे ९५१ विद्यार्थ्याना नभांगण फाऊडेशन यांच्या विद्यमाने शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेक जॉनसन साहेब जिल्हाधिकारी बीड व अध्यक्षस्थानी रहमान साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे लाभणार आहेत या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री श्रेया सचीन पिळगांवकर नभांगण फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा सत्यशोधक चित्रपटातील सावित्रीबाई यांच्या भूमिकेसाठी २०२५ च्या फिल्म फिअर अवार्ड विजेत्यां सिने अभिनेत्री राजश्रीताई देशपांडे उपस्थित राहणार आहेत. पाचेगाव परिसरात गेल्या चार वर्षापासून नदी खोलीकरण रुंदीकरणाद्वारे नंदनवन बनवण्याचे काम फाउंडेशन द्वारे राजश्रीताईंनी केले आहे .पाण्याबरोबर त्यांचे शिक्षण, महिलांचे आरोग्य या विषयात काम केले आहे. या अगोदरही त्यांनी जिल्हा परिषदच्या तीन शाळेचे अद्यावत बांधकाम करून दिले आहे. नभांगन फाउंडेशनव्दारे श्री कानिफनाथ नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या महिन्यात आल्या असता .जिल्हा परिषद पाचेगाव शाळेला त्यांनी भेट दिली. शाळेचे अंदाजे १९६५ ला इमारतीचे बांधकाम झाल्यामुळे इमारत मोडकळीस आली आहे .शाळाची ही अवस्था पाहून त्यांनी शाळाला नवीन खोल्या बांधकाम करून देण्याचा मानस व्यक्त केला. प्रशासकीय पुर्ततेसाठी सर्व कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हा परिषद बीडला मान्यतेसाठी पाठवला आहे. तरी शाळेच्या नवीन बांधकामाच्या पुढील नियोजनासाठी व शालेय साहित्य वाटपासाठी त्या उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती सुमंत पांडेसाहेब यशदा डायरेक्टर पुणे व अतुल कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स जिल्हा प्रतिनिधी बीड. ग.शि. गेवराई धनंजय शिंदे श्रीमती प्रियंका घोडके मॅडम मंडळ अधिकारी पाचेगाव हे उपस्थितीत राहणार आहेत .या कार्यक्रमासाठी परिसरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी विद्यार्थी ,पालक, हितचिंतक , परिसरातील व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद शाळा पाचेगाव व शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा प्राथमिक शाळा पाचेगाव तर्फे करण्यात आले आहे.
‌ ‌

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!