spot_img
spot_img

दखल न घेतल्याचा निषेध म्हणून १५ आँगस्ट रोजी १५ मिनिटे भोपळा,बेशरम घेऊन साचलेल्या चिखल -पाण्यात लोटांगण ————————————- जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,अभियंता आर.व्हि भोपळे यांना दिले निवेदन

कडा (प्रतिनिधी) जसे आपण शेरी या गावातील पुलाची पहाणी करुन प्रश्न मार्गी लावला तसाच कडा येथील प्रश्न मार्गी लावावा.मी संबंधित अधिकाऱ्यांना व्हाट्सअप वर फोटो,व्हिडिओ पाठवून संपर्क करून विनंती केली तरी दखल घेतली नाही. वृत्तपत्रातून त्याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या तरीसुद्धा दखल घेतली नाही याचा निषेध म्हणून १५ आँगस्ट २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११:३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ कडा (ता.आष्टी) गावातील दावलमलिक (शादवल) दर्गा समोर साचलेल्या चिखल-पाण्याच्या ढवात भोपळा,बेशरम घेऊन १५ मिनिटे लोटांगण घेऊन निषेध व्यक्त करणार बाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यदअली सय्यद यांनी तहसीलदार आष्टी व त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी पाटोदा,अभियंता आर. व्हि भोपळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ यांना दिले असून निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या मार्गावरील साबलखेड कडा आष्टी रस्त्याचे काम चालू असून आष्टी तालुक्यातील कडा या गावातील दावलमलिक (शादवल)दर्गा समोर रस्त्याचे काम करतांना दोन्ही बाजूंनी गटारी बनवल्या पावसाचे पाणी जाण्यासाठी त्या गटारीला जागोजागी चार इंचाचे छिद्रे ठेवली होती परंतु रस्ता बनवताना चक्क ते सगळेच्या सगळेच छिद्रे रस्त्यात बुजून टाकली. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्गच राहिला नाही. परिणामी दर्गा समोर कायमच पाण्याचा ढव चिखल साचून राहत आहे. ये-जा करतांना कसरत करावी लागत आहे पाय घसरून पडण्याची भिती, वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने मी संबंधित अधिकारी अभियंता भोपळे साहेब सह इतर संबंधितांना व्हाट्सअप वर फोटो, व्हिडिओ पाठवले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला परंतु ते अधिकारी म्हणतात की मी यांना सांगितले, मी त्यांना सांगितले, होईल तुमचे काम असे कारण देत टाळाटाळ करीत आहेत. एक पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता असूनही जर हे अधिकारी आमची दखल घेत नसतील तर सामान्य नागरिकांशी हे कसे वागत असतील ? कडा गावातील याच रस्त्यावर चिखल – पाण्याचे ढव मोठ्या पुलावर हि आहे आणि इतर ठिकाणी हि आहेत. सध्या कडिनदी वाहत असल्याने बस स्थानक,महेश मंदिर,हजरत मौलाली बाबा दर्गासह इतर देवस्थानात जाताना या रस्त्यावरून कसरत करत व वाहनांमुळे चिखल-पाणी अंगावर येणार नाही याची काळजी करत चालावे लागत आहे. तरी आपणांस कळकळीची विनंती आहे कि आपण नागरीकांना या होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे तसेच यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. तसेच यावेळी ही दखल घेतली गेली नाही तर लवकरच आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!