spot_img
spot_img

आ.सुरेश धस यांनी केली भगवान रामेश्वराची महापूजा ————————————— सौताडा येथे लाखो भाविकांनी घेतले भगवान रामेश्वराचे दर्शन

आष्टी (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे डोंगरदरीमध्ये असलेल्या भगवान रामेश्वराची तिसऱ्या सोमवारी आष्टी- पाटोदा- शिरूर चे आमदार सुरेश धस यांनी महापूजा केली. ही पूजा येथील पुरोहित पांडुरंग प्रभाकर देशमुख उर्फ पांडू देवा यांनी केली.
बीड जिल्ह्यामध्ये बीड -नगर रोडवर पाटोदा तालुक्यामध्ये सौताडा हे गाव आहे. या ठिकाणी असलेल्या डोंगरदऱ्याच्या कपारीत सुंदर असे भगवान रामेश्वराचे मंदिर आहे. या ठिकाणी मोठा धबधबा असल्याने आणि वनविभागाने हा परिसर विकसित केल्याने अत्यंत सुंदर आणि रमनिय असे हे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी दर श्रावण सोमवारी यात्रा भरते. श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा विशेष असतो. सोमवारी सकाळी ६ वाजता आष्टी-पाटोदा-शिरुरचे आमदार सुरेश धस, सौताड्याचे सरपंच बाळू घुले, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काका जाधव यांनी भगवान रामेश्वराची महापूजा केली. या पूजेचे पुरोहित या देवस्थानचे प्रमुख पांडुरंग प्रभाकर देशमुख उर्फ पांडू देवा शास्त्त्री यांनी केले. यावेळी भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती. सोमवारी दिवसभर हा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. या निसर्गरम्य ठिकाणी एरवी ही पर्यटकांची गर्दी असते. सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पोलीस विभागाकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला जातो. याशिवाय वनविभागाच्या अधिकारी आणी कर्मचारी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तैनात असतात. सोमवारी सौताडा येथे भगवान रामेश्वराचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.मागील काळापासून देवस्थान विकास कामापासून वंचित असून पाहिजे तसा विकास झाला नाही तो मी येणाऱ्या काळात भरून काढत देवस्थानसाठी “ब” दर्जा प्राप्त करून देणार असून यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. येणाऱ्या काळात देवस्थानच्या विकास कामांना या माध्यमातून गती मिळणार आहे. असून माझा बळीराजा सुखी कर अशी प्रार्थना यावेळी आ. सुरेश धस यांनी भगवान रामेश्वराकडे केली.
यावेळी जि. प.सदस्य माऊली जरांगे,माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, सभापती किरण शिंदे, सरपंच बाळू घुले,सुखदेव सानप,प्रदीप जाधव,शाहूराव टेकाळे,ऋषीकेश सानप, ऋषिकेश शेंम्बडे, काळू शिंदे,बाबासाहेब पुलावळे,बाळू काका शिंदे,भाऊसाहेब शिंदे, अनिल टेकाळे,आश्रू शेळके,अशोक सानप, गणेश सानप,संग्राम सानप,रामहरी सानप, रमेश भोरे,भरत शिंदे,अमोल शिंदे,दत्ता टेकाळे आदी सह प्रमुख मान्यवर,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!