अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथील अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आयोजित रोझ गोल्ड हाॅटेल येथे रविवार दि १० ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय “वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार” २०२५ सोहळ्यात, आष्टी येथील लोकमत/मराठवाडा साथीचे तालुका प्रतिनिधी तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम हे पत्रकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याने त्यांची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार म्हणून वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, रिल स्टार शिवानी बनकर, ॲक्टर सचिन चव्हाण, ॲक्टर अर्जुन अंबेकर, संस्थेचे अध्यक्ष तुषार बोरूडे, सिमा डुकरे यांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जाधव यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन उत्कृष्ट निवेदिका सिमा डुकरे यांनी केले तर आभार विशाल खिळे यांनी मानले.या कार्यक्रमास नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.