आष्टी (प्रतिनिधी) : बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आष्टीतील तालुका क्रीडा संकुल मैदानावर जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सायली हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या स्पर्धेत अंडर-14, अंडर-17 व अंडर-19 या गटांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून दमदार खेळ केला. यातील निवड झालेल्या खेळाडूंना आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
अंडर-14 गट – नुमान सय्यद, सुकृत पन्हाळकर, उमर शेख, आयुष येवले, आदित्य आजबे, आरव गायकवाड, अश्फाक सय्यद, संग्राम शिंदे, कृष्णा नाईकनवरे, आकाश रोकडे, आर्यन बनकर, वंश डोंगरे, अरविंद कारंडे, पार्थ वाघ, यावर शेख
.तर
अंडर-17 संघ पुढीलप्रमाणे –
हर्षद सानप, नैतिक आवारे, वैभव नेमनार, सोफियात सय्यद, साई घोडेश्वार, तेजस चोले,यश पाखरे, प्रवीण दराडे, फैज शेख,नुमान तांबोली, नैतिक जाधव, अविनाश शिंदे, गणेश थोरवे, प्रसन्न तांबे, सिद्धार्थ पानसांडे, उर्फात सय्यद, आयन सय्यद तर
अंडर 19 संघ पुढीलप्रमाणे –
ओमकार कदम, नुमान शेख, ऋषिकेश बन, यश बन, शिवम जमदाडे, आदित्य शिंदे, रोहित शिंदे, हुजेफ बेग, हादी खान, सैफ शेख, हर्षद मुथा, विश्वजीत गायकवाड, भावेश नाईकनवरे, नदीम शेख, अमन पठाण यांचा समावेश आहे यातील सतरा वर्षाखालील निवडलेल्या संघाचे सामने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे 19 ऑगस्ट पासून होणार आहेत तर उर्वरित दोन संघाचे राज्यस्तरीय सामने तारीख लवकरच जाहीर होणार आहे
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष आ. सुरेश धस, उपाध्यक्ष अविशांत कुमकर, सचिव सुशील तांबे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, नगरसेवक शरीफ शेख, सामाजिक कार्यकर्ते विनोद रोडे, दीपक उंबरकर, प्रवीण चाटे, रहीम शेख, समीर शेख, फजल शेख, पत्रकार प्रा. निसार शेख, अमोल पानसांडे, राजू सानप, संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.