आष्टी(प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्याच्या अकलुज येथे १९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा संघ निवडण्यासाठी आष्टी येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता, आष्टी-जामखेड रस्त्यालगत हंबर्डे महाविद्यालय शेजारील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन बीड जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला खेळाडूंसह क्रीडाप्रेमींची उपस्थित राहणार आहेत
या निवड प्रक्रियेमध्ये केवळ १७ वर्षांखालील नव्हे तर १४ वर्षे वयोगट आणि १९ वर्षे वयोगट यांच्यासाठीही बीड जिल्हा संघ निवडला जाणार आहे. निवडलेले संघ बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये करतील.
बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन बीड जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव सुशील तांबे, उपाध्यक्ष अविशांत कुमकर यांनी केले आहे.