आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील चिंचोली एकशिंगे येथे मोठ्या भाविक भक्तांची मांदीआळी असे येथे भक्तांच्या सोयीसाठी व मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे, वार गुरुवार दिनांक 7/8 2025 रोजी नवीन बांधकामाचे भूमिपूजन झाले आहे,नवीन मंदिरास कामास सुरुवात होणार आहे सर्व चिंचोली ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांनी अथक परिश्रमाने या कामाला सुरुवात होत आहे, येथे दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत चाललेले आहे हे सर्व लक्षात घेऊन नागरिकांनी नवीन मंदिराचे बांधकाम करण्याचे निर्णय घेत आहे व आज त्यांचे भूमिपूजन झाले आहे, चिंचोली व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते, व चिंचोली गड व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते