आष्टी(प्रतिनिधी)तालुक्यातील खानापूर येथील जनाबाई रावसाहेब तावरे पाटील यांचे सोमवार दि २८ जूलै रोजी सकाळी ९.३० वाजता वयाच्या ८५ वर्षी अल्पशा आजाराने अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर खानापूर येथील पाटील वस्ती वरील त्यांच्या शेतात सोमवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी. आमदार साहेबरावजी दरेकर नाना, जि.प. सदस्य .सतीश आबा शिंदे, युवा नेते श्याम भैय्या धस,ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे गुरुजी, ह .भ. प. शिवाजी महाराज कोकणे, ह .भ .प .भीमराव महाराज गायकवाड, ह .भ .प. गोविंद महाराज पवार यांनी श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य. खानापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खानापूर गावचे पोलीस पाटील प्रकाश रावसाहेब तावरे पाटील.व विजय रावसाहेब तावरे पाटील यांच्या मातोश्री होत्या. तर युवा उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील यांच्या आजी होत्या.