spot_img
spot_img

पाथर्डीत मनोज जरांगे यांच्या पाठींब्यासाठी साखळी उपोषण आमदार मोनिकाताई राजळे यांचा सहभाग

पाथर्डी प्रतिनिधी:- अन्न, पाणी, बायका, पोरं सगळ सोडून समाज हेच आपले कुटुंब मानत जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. समाजासाठी त्यांनी आज स्वत:च्या जीवाची बाजी लावली असून उभ्या महाराष्ट्रातून, खेड्या पाड्यातून त्यांच्या उपोषणाला पाठींबा मिळत आहे. लाखो नव्हे तर करोडो गरजवंत मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.
पाथर्डी शहरासह तालुक्यातील अनेक गावागावात जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन होत असुन या आंदोलनातुन सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
आज पाथर्डी शहरातील नाईक चौक येथे साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील युवकांना व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी पाठिंबा देत त्याही या साखळी उपोषणात सहभागी झाल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, माजी प.स.सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बंडू बोरुडे, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, सोसायटी चेअरमन संजय बोरूडे, संदीप एकशिंगे, राजेंद्र मरकड, बबन सबलस, माजी नगरसेवक महेश बोरुडे, अनिल बोरुडे, नामदेव लबडे, माजी सभापती काका शिंदे, जगदीश काळे, शिवाजी मोहिते, उद्धव माने, भगवान साठे, मंगल कोकाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्रिया देताना राजळे म्हणाल्या की, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा असून काल परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले की न्यायालयात टिकेल अशा पद्धतीचे आरक्षण मराठा समाजाला देऊ व मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याच्या सभेत ठामपणे व शप्पथ पूर्वक मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द दिलेला आहे. तरी सरकारने लवकरात लवकर या प्रश्नावर निर्णय घ्यावा मराठा समाजाचा आंदोलनाला वेगळे वळण लागू नये यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.
राज्यात मराठा आरक्षणाची लढाईने उग्र रुप धारण केले आहे करोडो समाज एकवटला आहे. जो समाज कधी नेत्यांना पाठीमागे बोलण्याचे धाडस करत नव्हता त्याच समाजाने आता नेत्यांना गाव बंदी केली आहे. त्यांचे ताफे अडवले जात आहेत. अधिकार्यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत, आमदारांचे घर, कार्यालय फोडले व जाळले जात आहेत. थेट तोंडावर खडे बोल सुनावले जात आहेत. एकंदरीत समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्या आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!