कडा(प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला भाविकांची अलोट गर्दी उसळी आहे हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यात पिंपरी घाटा येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. शिवमहापुराण कथा प्रवक्त्या ह.भ.प.अंकिता ताई खांडगे यांच्या सुमधुरवाणीतून संपन्न होत असून कथेला पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी उसळी आहे मानवी जीवनाचे कल्याण करणारी शिवकथा असून श्रद्धेने भक्ती केल्यास महादेव प्रत्येकाच्या संकटात धावून येतो मानव जन्म खूप कष्टाने मिळाला असून त्यास व्यर्थ गमावू नका जिथे शिव नाही अशी भूमी नाही प्रलयाच्या वेळी महादेवच तारणहार असणार हा भक्ताचा विश्वास असल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देवघरात शिवलिंगाची पूजा ही पूर्वापार होत आहे पवित्र श्रावण महिन्यात ह.भ.प.अंकिताताई खांडगे यांच्या सुमधुर वाणीतून आपल्याला महाशिवपुराण कथा ऐकण्यास मिळणे हे आपले भाग्य आहे त्यामुळे या सप्ताह सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांचा जनसमुदाय उसळला आहे