spot_img
spot_img

सुवर्णयुग मंडळाच्या अध्यक्षपदी गोपालसिंग शेखावत, उपाध्यक्षपदी उमेश रासने यांची निवड

पाथर्डी (प्रतिनिधी) पाथर्डी शहरातील सुवर्णयुग मंडळाच्या अध्यक्षपदी गोपालसिंग शेखावत, उपाध्यक्षपदी उमेश रासने यांची निवड एकमताने करण्यात आली. मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या वेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र शेवाळे, रमेश मोरगावकर, अविनाश मंत्री, संजय मेहेरकर, शरद भागवत, अजय भंडारी, बंडू दनापुरे, नंदकुमार डाळिंबकर, भैय्यासाहेब ईजारे, अल्पेश भंडारी, निलेश गांधी आणि ट्रस्टचे अध्यक्ष वैभव शेवाळे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मंडळाचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मंडळाच्या आर्थिक जमा-खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. मंडळ परिवारातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या बैठकीत गणेशोत्सव २०२५-२६ साठी नूतन उत्सव समिती गठीत करण्यात आली. यात गोपालसिंग शेखावत यांची अध्यक्षपदी, उमेश रासने यांची उपाध्यक्षपदी, तर योगेश घोडके (सचिव), ओमकार जोशी (सहसचिव), मोनल जोजारे (खजिनदार) यांची निवड झाली. शैलेंद्र दहिफळे आणि दत्ताजी पंडित सल्लागार म्हणून, तर डॉ. अभय भंडारी आणि गणेश बाहेती मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहणार आहेत. अमोल कांकरिया आणि अनिल खाटेर यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाथर्डी शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींमध्ये सुवर्णयुग मंडळाचे वर्षभर मोलाचे योगदान राहते. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळेच मंडळाला राज्य सरकारकडून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान पाथर्डीसाठी गौरवाची बाब आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मागील महिला उत्सव समितीच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. दिगंबर जोजारे,अभय गांधी, मुकुंद लोहिया, सतीश टाक, मुकुंद सुराणा, शाहरुख शेख, राहुल भगत, दीपक भागवत, गणेश महालकर, मोहन यादव, शब्बीर शेख,डॉ. राहुल वेलेदे,सुनिता उदबत्ते,उज्वला शेवाळे, शीतल लोहिया, मेघा महालकर आदी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!