कडा (प्रतिनिधी)अवतारमेहेर बाबा पी.पी.सी.ट्रस्ट, आरणगाव,अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सुलेमान देवळा येथील गरजू विद्यार्थ्यांना ३०० वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमानिमित्त आयोजीत कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. ठोंबरे सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “चांगल्या संस्कारातूनच चांगली पिढी घडते. शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचे संस्कारही विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे.”
या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. कलचुरे साहेब, मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, गावचे सरपंच श्री. दादासाहेब घोडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी खोरदे, उपाध्यक्ष श्री. राहुल घोडके, तसेच ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. अतुल घोडके, श्री. विभा साळुंखे, दामोपंत गव्हाणे सर, श्री. खांडवी सर श्री. लगड सर, श्री. काळे सर,श्री. दातीर सर, श्री.जाधव सर, श्री. मस्के सर, श्रीम.जगताप मॅडम, खोरदे मॅडम, आणि डॉ. सतीश सायंबर सर यांची उपस्थिती लाभली.
या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साधनांची कमतरता भरून निघाली असून, उपस्थित मान्यवरांनी ट्रस्टच्या या स्तुत्य कार्याचे कौतुक केल. तर मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी ट्रस्टचे आभार मानले.