spot_img
spot_img

शासकीय आयटीआय आष्टी येथे माजी सैनिक व वीर मातांचा विजय दिवस निमित्त सन्मान

कडा (प्रतिनिधी) श्री गुरुलिंग स्वामी जीबकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आष्टी येथे दिनांक २६ जुलै रोजी मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘विजय दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात माजी सैनिक, वीर माता व वीर पत्नी यांचा शाल व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध देशभक्तीपर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धक विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सैनिक श्री कैलास रेडकर फौजी यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते म्हणून शिल्प निदेशक श्री ज्ञानेश्वर दहिफळे, श्री भीमराव घागडे आणि श्री खामकर फौजी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री गणेश हडतगुणे यांनी केले.या वेळी ८६ वर्षीय माजी सैनिक श्री खामकर फौजी यांनी उपस्थितांना त्यांच्या चार युद्धांतील अनुभव सांगितले. त्यांनी युवांना निर्व्यसनी राहण्याचे, देशासाठी सदैव सज्ज राहण्याचे आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात उपस्थित वीर पत्नी केसरबाई अश्रुबा राऊत व संगीता ताई घोलप यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच पुढिल प्रमाणे माजी सैनिकांचा मान्यवर म्हणून गौरव करण्यात आला. श्री राजू जगदाळे, श्री भीमराव वालेकर, श्री रघुनाथ खोले, श्री दामोदर चव्हाण, श्री जालिंदर धोंडे, श्री धनंजय गावडे, श्री भाऊसाहेब भोसले, श्री मधुकर बांबदाळे, श्री अर्जुन गळगटे, श्री नारायण झगडे, श्री प्रल्हाद तोडकर, श्री प्रल्हाद आजबे, श्री गोरख पवार, श्री अरुण शेंडगे, श्री गोरख धनवडे, श्री सोपान कोकणे, श्री प्रमोद गळगटे, रहमान पठाण, श्री लक्ष्मण जगताप, श्री गोवर्धन तरटे, श्री विकास मस्के, श्री रमेश डिडुळ, श्री भाऊसाहेब नाकाडे, श्री वाहिद खान, श्री काझी साहेब यांचा समावेश होता. यावेळी आयटीआय संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अक्षय शिरस्वाल, महात्मा गांधी विद्यालय आष्टीचे सायकड सर व नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विलास डोके सर तसेच कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थी, शिक्षकवर्ग व नागरिकांची उपस्थिती लाभली. देशप्रेम व शौर्याचे स्मरण करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!