आष्टी (प्रतिनिधी) कोविड-19 या साथ रोगाच्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये जमावबंदी प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला असताना बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करून प्रतिबंधात्मक कायदा भंग केल्याच्या आरोपावरून आ.सुरेश धस आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा आज न्याय निर्णय होऊन आ.सुरेश धस यांचे सह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे..
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार सुरेश धस यांनी यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा आयोजित केला होता तात्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड-19 चे निमित्त समोर करून प्रतिबंधात्मक कायदा भंग केल्याचे दाखवून आमदार सुरेश धस आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वास्तविक पाहता हा मराठा समाज आरक्षण विषयी असलेल्या सामाजिक मागणीसाठी लाखोंच्या उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात होता हा मोर्चा समाजहित डोळ्यासमोर ठेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी शासनाच्या विरोधात मोर्चा काढला म्हणून आमदार सुरेश धस आणि इतर संयोजक यांचे विरुद्ध कलम 188,279,280 भादवि सह कलम 51(ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 2,3,4 साथीचे रोग कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला. आ.सुरेश धस यांच्या सह..पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव, लोकनेते गोपीनाथ रावजी ऊस तोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
सुखदेव अप्पा सानप,जि.प सदस्य माऊली जरांगे, युवा नेते सचिन उबाळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रदेशाध्यक्ष यशवंत खंडागळे,शेख वसीम, लोकनेते गोपीनाथरावजी ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेश प्रवक्ते अभिजीत शेंडगे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मीरा गांधले यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला होता
दि.२३ जुलै रोजी बीड न्यायालयाने आमदार सुरेश धस यांच्यासह मा.आ. लक्ष्मण पवार, मा.आ. आर.टी.देशमुख, राजेंद्र जाधव ,भारत जगताप,यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आमदार सुरेश धस हे समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे लोकप्रतिनिधी आहेत. आतापर्यंत मराठा आरक्षण प्रश्नासाठी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत मराठा आरक्षणासाठी विधानसभेपासून रस्त्यावरच्या लढाई मध्ये सतत समाजासोबत शासनाकडे लढाई लढत आहेत.. अशा प्रकारचे चार-पाच खटले त्यांच्यावर आष्टी न्यायालयात देखील दाखल झाले होते त्यात देखील ते निर्दोष सुटले आहेत अशा प्रकारचे त्यांच्यावर खटले दाखल झाले तरीही समाजकार्याचा वसा आणि वारसा त्यांनी जोपासला आहे.. या खटल्यामध्ये आमदार सुरेश धस आणि इतरांच्या बाजूने अॅड.नामदेव साबळे आणि अॅड. दिनेश हंगे आणि सहकाऱ्यांनी काम पाहिले… याप्रसंगी न्यायालयामध्ये उपस्थित वकील बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले..
➡️ बीड जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रस्त्यावर डिव्हायडर बसवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आ. सुरेश धस यांचे देण्यात आले
ॲड. यासीर पटेल
सचिव,
वकील संघ
बीड जिल्हा न्यायालय
➡️ आ.सुरेश धस हे सतत सामाजिक न्यायासाठी सतत संघर्ष करत असतात
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आयोजित केलेल्या मोर्चामुळे त्यांचे वर खटला दाखल झाला होता या खटल्यामध्ये ज्यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल मी त्यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो
ॲड. रोहिदास येवले
अध्यक्ष,
वकील संघ
बीड जिल्हा न्यायालय