आष्टी(प्रतिनिधी)तालुक्यातील कुरेशी समाज यांचा वडीलोपार्जीत जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहे व शेती व्यवसाय करीत आहे. व स्वतःची व कुटुंबीयांची उपजिवीका भागवीत आहे. पण कुरेशी समाज हा शासनाने निबंध घातलेले कोणतेही जनावर खरेदी विक्री कटींग करीत नाही तसेच शासनामार्फत जे जनावरांचे बाजार आहे त्यातुनच सर्व प्रक्रिया करून व्यवसाय करीत आहे.काही गुंड प्रवृत्तीचे लोक आपली पोळी भागविण्याकरीता कुरेशी समाजाला टार्गेट करून व्यवसाय करू देत नाही व खंडणीची मागणी करीत आहे समाजाच्या लोकांना अडवणुक करून त्यांचे कडील जनावरे हिसकावुन घेत आहे तसेच त्यांचे कडील पैसे देखील हिसकावुन घेत आहे व जबर मारहाण करून दहशत निर्माण करीत आहे त्यामुळे कुरेशी समाजाला कामधंदा करणे व शेती व्यवसाय करणे शक्य राहीले नाही व शासन दरबारी कोणी दखल घेत नाही व कुरेशी समाजाचे लोकांनवर उपासमारीची वेळ आली आहे. गुंड संघटना पोलीस यंत्रनेवर दबाव आणुन कुरेशी समाजाचे लोकांचा काहीएक दोष नसतांना खोटे गुन्हे दाखल करून घेण्यास दबाव आणत आहे व त्याचे दबावापोटी पोलीस यंत्रना कसलीही सहानिशा न करता त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देतात तसेच कुरेशी समाजातील लोकांनी त्यांना झालेल्या मारहाणी बाबत तकार पोलीस स्टेशन येथे दिली तर त्याची तक्रारही घेतली जात नाही आमचे संविधानीक हक्क व अधिकार सर्व धोक्यात आलेले आहे.याबाबत आष्टी तहसील कार्यालयावर कुरेशी समाजांच्या वतीने मंगळवार दि २२ जूलै रोजी दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील काही गावांमध्ये कुरेशी समाजावर सतत अन्याय होत आहे व कुरेशी समजाच्या अडी अडचणी कोणीही शासन दरबारी दखल घेत नाही व त्यामुळे कुरेशी समाजाचे संविधानिक हक्क व अधिकार धोक्यात आलेले आहे शासनाचे कुरेशी समाजाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले ते न करता कुरेशी समाजाचे समस्या जाणुन घ्यावे व त्याचे अन्न व उपजिविकेसाठी योग्य तो निर्णय घ्यावा त्याचे अडीअडचणी समजुन घ्यावे त्याचे निवारण करावे त्यासाठी सदरचे निवेदन तहसीलदार यांच्या शासन दरबारी दिले आहे.या मोर्चात माजी नगरसेवक तथा हाजी सादीक कुरेशी,शाकीर कुरेशी,वहाब कुरेशी, इरफान कुरेशी,तय्यब कुरेशी,राजु सौदागर, अन्सार कुरेशी,रऊफ कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य शफ्फी कुरेशी,सिराज कुरेशी,आयाज कुरेशी,शरीफ कुरेशी,शारूख कुरेशी,दौलावडगाव येथील माजी उपसरपंच बबलू कुरेशी,खडकत येथील ग्रा प सदस्य मौहमद कुरेशी आदी मोठ्या संख्येने आष्टी तालुक्यातील कुरेशी समाज बांधव सहभागी झाले होते.यावेळी कुरेशी समाजांच्या मोर्चाला रिपाइं आठवले गटांचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी पाठिंबा दिला.
➡️ कुरेशी समाजावर उपासमारीची वेळ आल्यामुळे मायबाप सरकारने सर्व समाजाची समस्या दुर करावी व योग्य ते निर्देष संबंधीतास दयावे व आमच्या गरीबांवर का अन्याय करता मोठ मोठ्या कंपनीवर कारवाई करावी व बाहेर देशात जो निर्यात होतो त्यांना थांबावे व आमच्या गरीबांवर होणारा अन्याय थांबवा आणि शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा
– माजी नगरसेवक तथा हाजी सादीक कुरेशी आष्टी