कडा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी येथे सालाबाद प्रमाणे ह भ प सद्गुरु मदन महाराज यांनी प्रारंभित केलेल्या तसेच वै प.पू संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत श्री हनुमान मंदिर पिंपरी घाटा येथे श्रावण शुक्ल १.शुक्रवार दि.२५/७/२०२५ते शुक्रवार दि.१/८/२०२५ या काळात शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणचे आयोजन करण्यात आले आहे
शिव महापुराण कथा प्रवक्ते ह.भ.प.अंकिता ताई खांडगे श्रीक्षेत्र आल्हणवाडी ता.पाथर्डी यांच्या रसाळवाणीतून संपन्न होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवार दिनांक २५/७/२०२५रोजी सकाळी प्रतिमा ग्रंथ आणि शिव महापुराण कथा प्रवक्ते ह भ प अंकिता ताई खांडगे यांची मिरवणूकीने होईल नंतर संत महंत व मान्यवरांच्या हस्ते वीना पूजन होऊन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे काकडा भजन सकाळी ७ ते ८ विष्णुसहस्रनाम सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी११ ते१२ गाथा भजन दुपारी २ते ५ शिवमहापुराण कथा सायंकाळी ५-६ हरिपाठ रात्री ९-११ हरिकीर्तन रात्री१२-४ जागर होईल तर सप्ताह दरम्यान रात्री ९-११ शुक्रवार दिनांक २५/७/२०२५ रोजी वैराग्यमूर्ती ह. भ. प.रघुनाथ महाराज धामणगाव कर यांचे हरिकीर्तन होईल शनिवार दि.२६/७/२०२५ रोजी रात्री९-११ ह.भ. प. आदिनाथ महाराज आंधळे (श्री क्षेत्र महादेव गड संस्थान माणिकदौंडी) यांचे हरिकीर्तन होईल रविवार दि.२७/७/२०२५ रोजी रात्री ९-११ या वेळेत ह. भ. प .भागवत महाराज उबंरेकरकर (श्रीक्षेत्र वृद्धेश्वर संस्थान) यांचे हरिकीर्तन होईल सोमवार दि.२८/७/२०२५रोजी रात्री ९-११ या वेळेत ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भालसिंग (वै. यादव बाबा संस्थान वाघोली) यांचे हरिकीर्तन होईल मंगळवार दिनांक २९/७/२०२५ रोजी ह. भ.प.कुमारी कांचनताई शेळके (सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार अमडापूर जि. यवतमाळ) यांचे हरिकीर्तन होईल बुधवार दि३०/७/२०२५ रोजी ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री (मठाधिपती श्रीक्षेत्र तारकेश्वर गड संस्थान) यांचे हरी किर्तन होईल गुरुवार दि. ३१/७/२०२५ रोजी सायंकाळी६ ते ८ या वेळेत ह.भ.प.महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड कर (मठाधिपती गहिनीनाथ गड संस्थान) यांचे हरिकीर्तन होईल तर शुक्रवारी दिनांक १/८/२०२५ रोजी सकाळी ९ ते११ या वेळेत ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल (अध्यक्ष मदन महाराज संस्थान कडा) यांचे काल्याचे किर्तन होईल यानंतर महाप्रसाद होईल तरी आपण सर्वांनी या शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहुन कथा श्रवणाचाआनंद घ्यावा अशी पिंपरी घाटा येथील ग्रामस्थांनी विनंती केली आहे