आष्टी ( प्रतिनिधी) आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या आष्टी मंडळ, कडा मंडळ, पाटोदा मंडळ, आणि शिरूर (कासार) मंडळ अध्यक्षांच्या निवडीमध्ये आ.सुरेश धस यांच्या कट्टर समर्थकांचीच वर्णी लागली असून या निवडी मधील
” सोशल इंजिनिअरिंग ” मुळे सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळाले आहे..
भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्ष पदाच्या नियुक्ती अनेक दिवसांपासून प्रतीक्षेमध्येच होत्या मात्र पुन्हा एकदा आष्टी विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यांच्या मंडळ अध्यक्षपदी निवडीवरून आ.सुरेश धस यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राहिले आहे..
मुंबई येथे प्रदेश कार्यालयामध्ये आष्टी मंडळ अध्यक्षपदी रमेश गावडे, कडा मंडळ अध्यक्षपदी अनिल ढोबळे, पाटोदा मंडळ अध्यक्षपदी भागवत येवले आणि शिरूर (कासार) मंडळ अध्यक्षपदी सुरेश उगलमुगले या नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना सन्मानपत्र सह नियुक्तीपत्र आमदार सुरेश धस यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे सलीम जहांगीर उपस्थित होते या चारही मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडीवरून आमदार सुरेश धस यांनी सर्वसाधारण प्रवर्ग इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग असा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केल्यामुळे सुरेश धस यांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांना समान न्याय देण्यात येतो असा संदेश या निवडीद्वारे दिलेला दिसून येत आहे