spot_img
spot_img

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक सुलेमान बाबा यांचा गुरुवारी ऊरुस

कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील ग्रामदैवत हजरत सुलेमान बाबा यांचा उरूस आज गुरुवार रोजी साजरा होत आहे.
सुलेमान बाबा यांचा ऊर्स म्हणजे यात्रा आषाढ महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी असते परंतु लक्ष्मी आईची यात्रा तिसऱ्या मंगळवारी झाल्या शिवाय बाबांची यात्रा होत नाही.म्हणून यंदा चौथ्या गुरुवारी ही यात्रा साजरी होत आहे.ही यात्रा गावातील तसेच बाहेरील सर्व जाती धर्मातील लोकं मोठ्या उत्साहात साजरी करतात.यावेळी बाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.सकाळी गावातून मिरवणूक काढली जाते.त्यानंतर डोंगरावर असलेल्या दर्ग्यावर चादर अर्पण केली जाते.त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.त्यानंतर संध्याकाळी छबीना मिरवणूक काढली जाते.यामध्ये गावातील सर्व जाती धर्मातील लोकं तरुण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सिध्दार्थ भानुदास भादवे यांनी स्वखर्चाने दर्गा परिसरात पत्र्याच्या शेडच काम केले असून त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक एकतेचा चांगला संदेश गेला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!