अहिल्यानगर ( प्रतिनिधी) : “शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.20 जुलै 2025 रोजी दु.3 वाजता कोहिनूर मंगल कार्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
सदर बैठकीमध्ये आळंदी, पुणे येथे होणा-या “ दुसरा मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्यसंमेलन ” संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकास्तरीय शाखा कार्यरत करून तालुका शाखा कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी तारखा निश्चित करण्यात येणार आहेत. मध्यवर्ती साहित्य संवाद या कार्यक्रमासाठी अध्यक्ष, काव्यसंमेलन अध्यक्ष, परिसंवाद विषय व वक्ते,प्रमुख पाहुणे, समारोप प्रमुख पाहुणे निश्चित करणे,स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व इतर साहित्य,पुरस्कारांची नावे निश्चित करणे.यासह महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.तरी साहित्यिकांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.