spot_img
spot_img

आष्टी तालक्यातील सन २०२५ – २०३० सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

आष्टी (प्रतिनिधी) -आष्टी तालुक्यातील सर्व जनतेस जाहीर आवाहन करण्यात येते की , मा. जिल्हाधिकारी बीड यांचे अधिसूचना जा.क्र.२०२५/जिबी/डेस्क-२/२०२५ – २०३० ग्रा.पं. सरपंच आरक्षण /कावि-१६९१ दि.०८/०७/२०२५ अन्वये ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील राजपत्र असाधारण भाग चार-ब दि.१३/०६/२०२५ अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम १९६४ मधील नियम ३ (अ) प्रमाणे तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तसेच समांतर प्रवर्गासाठी आगामी पाच वर्षाकरिता (सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी) गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदासाठी सोडत पध्दतीने आरक्षण नव्याने दि.१५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसिल कार्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरीकांनी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास तहसिल कार्यालय आष्टी येथील सभागृहात दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!