आष्टी (प्रतिनिधी) :आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च ,आष्टी (डी फार्मसी| बी फार्मसी आणि एम फार्मसी) या कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बी फार्मसी व थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी प्रवेश अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्रास महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष एमएचसीईटी सेलची दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2025- 26 याही वर्षी मान्यता मिळाली आहे सुविधा केंद्र FC/SC- 2560, प्रथम वर्ष बी फार्मसी पदवीच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दिनांक 7 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे, तसेच थेट द्वितीय वर्ष बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेला 4 जुलै पासून सुरुवात झाली आहे, रजिस्ट्रेशन प्रक्रिया प्रथम वर्ष दिनांक 14 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे व थेट द्वितीय वर्ष 16 जुलै पर्यंत चालणार आहे अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी दिली. महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http//cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर या प्रवेश प्रक्रिये बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे, आष्टी येथील फार्मसी कॉलेजमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, सर्व स्कॅनिंग केलेले कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. रजिस्ट्रेशन साठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेले सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावेत प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे प्रथम व द्वितीय व पुढील फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबीचा समावेश आहे प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आव्हान कॉलेजचे प्राचार्य व प्रवेश प्रक्रिया समन्वयक यांनी केले आहे.