कडा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील सोलापूर वाडी येथील वसंत नाईक कृषी फलोत्पादन पुरस्कार प्राप्त इंजिनीयर व प्रगतशील शेतकरी हनुमंतराव गावडे आणि एम एस्सी शिक्षण झालेल्या कल्पनाताई गावडे या उच्चशिक्षित दांपत्याने खडकाळ माळरानावर शेती समृद्ध केली आहे दुष्काळग्रस्त भाग असल्याने कमी पाण्यावर येणारी या भागातील परिस्थिती पूरक पिकावर अभ्यास करून गावडे दांपत्याने ड्रॅगन फूडची यशस्वी पीक घेत आर्थिक मजबुतीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
उच्चशिक्षित असूनही शेती समृद्ध करण्यासाठी योगदान देणाऱ्या कल्पनाताई गावडे यांचा शेती बाबतचा आत्मविश्वास भक्कम आहे शेतीसाठी हे दांपत्य गाव सोडून शेतात राहण्यासाठी गेले शेतीतील सगळ्या बाबी शिकून घेतल्या पिकांचा बहार धरण्यापासून खत पाणी आणि इतर बाबींपासून तोडणीपर्यंतचे काम स्वतः कल्पनाताई गावडे पाहतात त्या स्वतः शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर चालवतात या गावडे दांपत्यांना संपूर्ण शेती हळूहळू डेव्हलप करायची आहे
या सर्व कार्याचा गौरव म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षा शिवमती सुवर्णाताई गिर्हे यांनी सोलापूर वाडी येथे जाऊन गावडे फार्मला भेट दिली संपूर्ण शेती व्यवस्थापन पाहून त्यांना गावडे दांपत्याचे खूप कौतुक वाटले त्यांनी गावडे दाम्पत्याचा सत्कार केला यावेळी डॉक्टर बाळासाहेब गिर्हे व शिरिष थोरवे उपस्थित होते