आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अमरापूर ते पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना रविवार दि २९ जून रोजी दुपारी ४ वाजता आष्टी येथील डोईठाण रोडवरील शिंदेवाडी फाटा येथे प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी चहा-बिस्किटांचे अल्पोपहार वाटप केले. ही मोहीम संघाच्या सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती. यावेळी भैरवनाथ पायीं दिंडी अमरापूर ते पंढरपूर दिंडीतील ह.भ.प. काका महाराज मुखेकर,ह.भ.प. उद्धव महाराज जाधव यांचे आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार समीर शेख, मारूती संत्रे,डिमोलेशन कॉन्ट्रॅक्टर अक्षय भोसले,गुलाब काकडे, राजेंद्र पोकळे, गणेश पोकळे,काकासाहेब पोकळे,सागर नन्नवरे,मिरा थोरात,अमृपाली चव्हाण यांनी स्वागत केले. याप्रसंगी अमरापूर येथील ह.भ.प. काका महाराज मुखेकर व वारकऱ्यांनी युवा पत्रकार संघाच्या या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक केले. “सेवा हाच परमेश्वराचा मार्ग”या भावनेतून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक सेवेच्या अनेक कार्यक्रमांचा भाग म्हणून वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आले तर हा उपक्रम पुढील वर्षीही अशाच प्रकारच्या सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संघाचे मनोधारण असल्याचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी सांगितले