आष्टी (प्रतिनिधी)
आगामी काळामध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना निवडणुकांमध्ये मते मागण्यासाठी जनतेकडे जावे लागणार आहे मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही कोणत्या तोंडाने यांना मते मागणार आहोत ? असा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे शासनाने विना विलंब मराठा समाजास आरक्षण जाहीर करावे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले..
आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते
ते पुढे म्हणाले की,
कोविड सारख्या महामारीच्या काळात देखील मी २४ तास जनतेत राहून काम केले परंतु आता जनतेच्या अपेक्षेप्रमाणे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेत जाणे अवघड झाले आहे मात्र मराठा आंदोलनामुळे षंढ म्हणून घरात बसण्याची वेळ माझ्यासह सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्यावर आली आहे ही अत्यंत खेद जनक बाब आहे.
ओबीसी तील छोट्या घटका विषयी मला काही म्हणायचं नाही मात्र आमचे मराठा समाजाचे लोक लोक पंजाबराव देशमुख साहेब यांच्या सांगण्यावरून जे कुणबी झालेले आहेत.ते आम्हाला तीव्र विरोध करत आहेत याच वाईट वाटत आहे.विदर्भातील नेते असलेले तायवाडे यांना त्या भागातील काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षांचे समर्थन आहे परंतु मराठवाड्यातील ९९% मराठा समाज जो आरक्षणापासून वंचित आहे त्यांच्या बाजूने जर मनोज जरांगे पाटील बोलत असल्यामुळेच आम्हालाही त्यांची बाजू घ्यावी लागेल आता शासनाने विना विलंब मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे
कारण सध्याचे पाच दिवसाच्या उपोषणामुळे समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आता लोक ऐकून घ्यायला तयार नाहीत.समजून घेण्याचा तर विषय येत नाही
आज जरांगे पाटील यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचेशी चर्चची तयारी दर्शवली आहे ही बाब अत्यंत चांगली आहे. उपमुख्यमंत्री,आणि मुख्यमंत्री हे आरक्षणा संबंधी सकारात्मक आहेत. देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या कालावधीत किमान एस ई बी सी या प्रवर्गातून आरक्षण दिले होते.परंतु सद्यस्थितीत त्यांनाच टार्गेट केलं जातं आहे.परंतु ज्यांनी काहीच केलं नाही ते फक्त या प्रश्नासंबंधी सहानुभूती दाखवत आहेत गेल्या अनेक वर्षात त्यांना हे करता आले असते परंतु त्यांनी काहीही केलेले नाही अशी नाव न घेता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रकाराविषयी वाईट वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विदर्भातील
मराठा समाज हा ९९टक्के कुणबी झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातही जवळपास ९५ टक्के कुणबी झालेला आहे कोकणातही बहुतांश कुणबी आहेत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील सुद्धा ५० टक्के कुणबी झालेले आहेत सर्वाधिक प्रश्न हा मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील मराठा समाजाचा असून त्यामुळे १६ टक्के आरक्षणाची मागणी असली तरी काही टक्केवारी कमी झाली तरी चालेल परंतु आता यापुढे वेळ गमावून चालणार नाही आरक्षण जाहीर करणे आता आवश्यक झालेले आहे.त्यामुळे आता विलंब करण्यात अर्थ नाही.निर्णय तात्काळ घेण्याची विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आ.सुरेश धस यांनी केली आहे