अहिल्यानगर (प्रतिनिधी) :’सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपतदादा बारस्कर यांच्या स्वागताध्यक्षतेखाली पार पडले,या साहित्य संमेलनाची स्मरणिका लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून ऑगस्ट मध्ये पुणे येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन व साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.’ अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य ची सर्वसाधारण सभा नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सुनील गोसावी यांनी गेल्या वर्षभरात राबविलेले विविध साहित्यिक उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. भविष्यकालीन योजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मे.लंगोरे अँड असोसिएट यांनी तयार केलेल्या २०२४/२५ चे ऑडिट रिपोर्ट ला मंजुरी देण्यात आली. राजेंद्र उदागे गौरव ग्रंथ व पावसाळी प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचे ठरले.
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय काव्यसंमेलना ची माहिती देताना श्री.उदागे म्हणाले की, राज्यभरातून शब्दगंध ला अनेक सभासद जोडलेले असून पुणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे.सर्वांना एकत्र भेटण्यासाठी या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी साहित्यिक कार्याबद्दल काही सभासदांचा गौरवही करण्यात येणार आहे.पुणे जिल्हा कार्यकारी मंडळ निवडण्यात येणार असून इतरही जिल्ह्यात प्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. शब्दगंध च्या वतीने नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळेचे आयोजन करणे बाबत भगवान राऊत यांनी संकल्पना मांडली. यावेळी ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य डॉ. जी.पी ढाकणे, बापूसाहेब भोसले, शर्मिला गोसावी, शाहीर भारत गाडेकर, प्रा.डॉ.अशोक कानडे, डॉ.अनिल गर्जे,राजेंद्र फंड,प्रशांत सूर्यवंशी, बबनराव गिरी,मकरंद घोडके, रामदास कोतकर, रुक्मिणी नन्नवरे, सुरेखा घोलप यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय काव्यसंमेलन साठी मोबाईल नंबर ९९२१००९७५० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.