spot_img
spot_img

ग्रामस्थांनी मागणी करताच आ.सुरेश धस यांनी ११ विद्युत रोहित्र केले उपलब्ध ********************************* विजेचा प्रश्न मार्गी लागल्याने आ.सुरेश धस यांचे मानले आभार;गावात मिरवणूक काढत वाजतगाजत केले स्वागत

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी विधानसभा मतदार संघातील चिखली या गावाला ओव्हरलोड वीज विद्युत रोहित्रामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता.
आ.सुरेश धस यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी करताच पाठपुरावा करून गावठाणअंतर्गत ११ मंजुरी मिळाली असून विद्युत रोहित्र उपलब्ध करून दिले.तात्काळ उपलब्ध केलेल्या रोहित्राची ग्रामस्थांनी गावात वाजतगाजत मिरवणूक काढत जंगी स्वागत करत राज्य सरकार व आ.सुरेश धस यांचे आभार मानले.
आ.सुरेश धस आष्टी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकास करतांना रस्ते, पाणी, आरोग्य या बरोबरच विजेच्या समस्या देखील सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याने ओव्हरलोड वीज रोहित्रामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नवीन वीज रोहीत्रांना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.सुरेश धस यांचा पाठपुरावा सुरु होता.वीज हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असून कृषी पंपांना नियमित पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा व्हावा हि प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते.परंतु त्याच ट्रांसफार्मरवर कृषी पंप व गावठाण अंतर्गत घर वापर वीज त्यामुळे वीज रोहित्र ओव्हरलोडमुळे कायम नादुरुस्त होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेवून यापूर्वी देखील ओव्हरलोड वीज रोहीत्रांवर असलेला लोड कमी करण्यासाठी आ.सुरेश धस यांनी नवीन ११ रोहित्रांना मंजुरी मिळवून या गावात बसविले जाणार आहेत.तात्काळ उपलब्ध केलेल्या रोहित्राची ग्रामस्थांनी गावात वाजतगाजत मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. व आ गया वेगळ्या पद्धतीने आमदार सुरेश धस यांचे आभार मानले. ११ ट्रांसफार्मर १०० केव्ही चे गावाला मिळाले आहे.यामुळे पुढील २५ वर्ष विज ग्राहकांना विजेचा प्रश्न भासणार नाही.या गावातील ओव्हरलोड वीज रोहीत्रांवर असलेला लोड कमी होण्यास मदत होवून त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल या गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहे.
यावेळी महादेव शिंदे,गणेश शिंदे ,शिवाजी आवारे,नवनाथ चखाले,शांतीलाल घोलप, शहाजी कोकणे,गौतम चखाले,दत्ता कोकणे, दत्तात्रय गोयकर,अब्बास शेख,कांता टकले,दत्तु टकले,रतन शिंदे, शिवाजी घोलप,रमजान पठाण,हमीद शेख,अण्णा तांबे, गोरख कोकणे,बंडू कोकणे,भैरू तांबे,भाऊ शिंदे, आत्माराम आवारे,बंडू कोकणे, अशोक मांडगे,लक्ष्मण सापते,विलास गोयकर,देविदास तांबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!