आष्टी – (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातीलच नव्हे तर बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद बीड ची सर्वात जास्त मुलींची पटसंख्या असलेली व मुलींना स्वरक्षणाची हमी देणारी तसेच १०० % निकालाची उज्जल परंपरा असलेली जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी, ता. आष्टी, जि. बीड असून आजच्या धावपळीच्या युगात गुणवत्तेचं शिक्षण मिळणं म्हणजेच समाजाच्या भविष्याची ग्वाही, हेच वास्तव आष्टी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेने आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे. आधुनिक शाळांच्या झगमगाटात ही शाळा गुणवतेचे ठिकाण आहे. शहर बदलतील, देश बदलेल हे स्वप्न साकार करण्याची खरी सुरुवात होते ती प्राथमिक शिक्षणातून आणि हेच स्वप्न साकार करण्याचे कार्य आष्टी येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला सातत्याने करत आहे. गुणवत्ता, उपक्रमशीलता, स्वच्छता, पर्यावरण सजगता आणि सर्वांगीण विकास यामुळे ही शाळा खऱ्याअर्थाने शिक्षण व्यवस्थेचा मानबिंदू ठरली आहे. सुसज्ज दोन मजली इमारत, २४ वर्गखोल्या, सी. सी. टिव्ही कँमेरे, शिक्षकांसाठी डिजीटल उपस्थिती, शुद्ध पाणी पिण्याची खास व्यवस्था, स्वतंत्र बोरवेल, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वयंपाकासाठी अद्ययावत किचन शेड, बाग फुलवणारा हिरवागार परिसर हे शाळेचे जणू आकर्षण बनले आहे. परिसर अनेक प्रकारांच्या झाडांनी नटलेला असून, पर्यावरणस्नेही शाळा म्हणून तिची वेगळी ओळख आहे. शाळेत इ. १ ली ते इ. १० वी सर्व वर्ग सेमी इंग्रजीत असून प्रशिक्षित व पुरस्कारप्राप्त शिक्षक मार्गदर्शन करतात. स्पर्धा परीक्षा, सामान्यज्ञान, नवोदय, मंथन, शिष्यवृत्ती परिक्षा, एनएमएनएस परिक्षा, विज्ञान प्रदर्शन, कला – क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, शैक्षणिक सहली, महिला पालक मेळावे, बालवृक्ष दिंडी, शालेय व वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक यांसारखे उपक्रम नियमित प्रशालेत राबवले जातात, या शाळेची सुंदर रचना, उत्कृष्ट शिकवण आणि सर्वांगीण विकास याचा परिपाठ राबवते आहे. आज वेगवेगळ्या भागात अनेक प्राथमिक शाळांची अवस्था दयनीय आहे, मात्र जिल्हा परिषद कन्या प्रशाला याला अपवाद ठरते. शिक्षण हीच खरी शक्ती आहे हे पुन्हा सिद्ध करणारी ही शाळा खऱ्याअर्थाने ” गुणवत्तेचं खणखणीत नाणं ” आहे आणि जिल्हा परिषद शाळा हेच अस्सल सोनं हे सत्य अधोरेखित करते. अशा या सर्वगुणसंपन्न व आदर्श शाळेची पीएम श्री शाळेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी, ता. आष्टी, जि. बीड ची पीएम श्री शाळेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेतील आदर्श शिक्षक – शिक्षिका आबासाहेब खताळ (मुख्याध्यापक), सतिश दळवी, श्रीम. सुरेखा कुटे, श्रीम. संगिता दहिफळे, सुरेश नरोड, श्रीम. स्वाती टेकाडे, श्रीम. नाजिया बागवान, भोकरे संजय, विठ्ठल जगताप, श्रीम. लतिका तरटे, राजेंद्र लाड, दत्तात्रय गाडेकर, देविदास शिंदे, आप्पासाहेब काळे, श्रीम. आशा शिंदे, श्रीम. रुक्मिण करपे, शिवाजी आव्हाड, श्रीम. अश्विनी धस, श्रीम. रोहिणी कार्ले, संतोष खंडागळे, राजेंद्र शेळके, शरद राऊत, श्रीम. धोंडे मनिषा, श्रीम. धोंडे अर्चना, चित्रकला शिक्षिका श्रीम. कोमल थेटे, संगित शिक्षिका श्रीम. सुनिता पोकळे, व्यावसायिक शिक्षक भागवत वायाळ, श्रीम. शितल जगताप, मुख्यमंत्री युवा शिक्षिका कु. अमृता जोशी तर आदर्श सेवक संतोष धोंडे, श्रीम. सावित्रा जाधव यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. सुजाता झगडे व सदस्य श्रीम. प्रभा वायकर, श्रीम. समरीन काझी, श्रीम. जयश्री धोंडे, श्रीम. अश्विनी घालमे, श्रीम. विद्या डोंगरदिवे, श्रीम. अनिता लांबडे, श्रीम. उज्वला धोत्रे, कु. जैनब शेख, कु. नम्रता भवर, श्री. लक्ष्मण रेडेकर सर, श्री. डॉ. नदीम शेख साहेब आदींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.