spot_img
spot_img

आ.सुरेश धस यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्ध्याचा सत्कार

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी मतदारसंघातील शैक्षणिक व विविध क्षेत्रांत आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर जिद्द आणि चिकाटी दाखवत भरारी घेऊन यश संपादन करत आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थी व पालक यांचा आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे अद्वेतचंद्र निवासस्थानी सत्कार करत अभिनंदन केले.
यामध्ये आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील विशाल शेकडे या युवकाची आर्मी लेफ्टनंट या पदी नियुक्ती झाले.पाटसरा येथील राहुल ज्ञानदेव सांगळे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दुय्यम अभियंता या पदावर नियुक्ती झाले. शिरूर तालुक्यातील वारणी येथील जयेश सुभाष केदार याला (५४७ गुण),संकेत सोमनाथ केदार (५२४ गुण),प्रमोद सुरेश डोंगरे (५२० गुण) या विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत यश संपादन करून ते MBBS साठी पात्र झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आष्टी मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी सत्कार करून अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती रमजान तांबोळी, सभापती बाळासाहेब केदार, एन.टी.गर्जे भाऊ,चेअरमन आदिनाथ सानप,रंगनाथ धोंडे,बाळू शेठ मेहेर,रामशेठ मधूरकर, आत्माराम फुंदे,प्रशांत गर्जे,राहुल गर्जे, यांच्यासह पालक ,नागरिक आदी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!