आष्टी (प्रतिनिधी)नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत देवळाली ता.आष्टी या ठिकाणी लोकसभागीय पद्धतीने गाव स्तरीय सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया पार पडली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर चैतन्य स्वामी मंदिरासमोर कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला सरपंच ,कृषी विकास समिती ,शालेय विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ व कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.
नानासाहेब देशमुख कृषी योजना या योजनेला पोखरा योजना ( PoCRA ) म्हणून ही ओळखले जाते ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे हा आहे ही योजना जागतिक बँकेच्या मदतीने राबवली जात आहे या योजनेची मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे :
(१) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण करणे
(२) कृषी क्षेत्राचा विकास सिंचन सुविधा फळबाग लागवड शेडनेट पॉलिहाऊस नर्सरी गोदामी अशा विविध बाबींसाठी अनुदान देणे
(३) हवामान बदलास प्रतिसाद दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय योजनांसाठी हवामान लवचिक धोरणे आणि तंत्रज्ञान विकसित करणे
(४) दुष्काळमुक्त महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना करणे या योजने समाविष्ट असलेल्या प्रमुख प्रमुख बाबी : (१)शेतकऱ्यांसाठी अनुदान ठिबक सिंचन सूक्ष्म सिंचन फळबाग लागवड शेडनेट पॉलिहाऊस नर्सरी गोदामे इत्यादींसाठी अनुदान दिले जाते (२) कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टरचलित अवजारे बी बी एफ यंत्र इत्यादीसाठी अनुदान (३) शेतकरी गट आणि संस्थांना सहाय्यक व्यवसाय योजनांसाठी आर्थिक सहाय्य जसे की प्रक्रिया बियाणे पुरवठा आणि कस्टम हायरिंग सेंटर ४) डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हवामान अनुकूल कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विविध योजनांची सविस्तर माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अशोक शेंडगे यांनी शेतकऱ्यांना सांगितली