spot_img
spot_img

नुकसान ग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आमदार सुरेश धस शेतकऱ्यांच्या बांधावर

आष्टी (प्रतिनिधी) राज्यभरात मान्सून दाखल होत असताना दि.११ रोजी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार सुरेश शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासनाला समवेत घेऊन पोहोचले आणि प्रशासनाला सूचना देऊन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.
दि.11 जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांची फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक गावातील नागरिकांचे घरांची पडझड झाली असून आणि काही शेतकऱ्यांचे कुक्कुटपालन शेड, गोठे, आणि जनावरांची जीवित हानी झाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरीआष्टी, बेलगाव,मुर्शदपूर,किन्ही,बावी, कापशी यासह पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, डागाची वाडी, उंडेवाडी, कोतन, पांढरवाडी, गांधणवाडी, साबळेवाडी,
इतर गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून तारा तुटल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
या गावांना भेटीत देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार सुरेश धस यांनी दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनी देखील आमदार सुरेश धस हे बांधावर आलेल्या आधार मिळयाच्या भावना व्यक्त केले आहेत.
तर सकाळीच महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरे, कनिष्ठ अभियंता, तहसीलदार, नायब तहसीलदार,तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, गट विकास अधिकारी ग्रामसेवक आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते यांची तातडीने बैठक घेतली. यामध्ये काल झालेल्या पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक शेतकरी आणि नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तरीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबतचे फोटो काढून प्रशासनाशी संपर्क साधावा शासनाकडून नुकसान भरपाई साठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले.

या पाहणी दरम्यान परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, मा. नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,
माऊली जरांगे भाऊसाहेब भवर,सरपंच अशोक मुळे,इंद्रजीत गर्जे, अश्रूबा गोल्हार,कारभारी गर्जे,बाबू गर्जे, अशोक जेथे,महेश खेगरे, दादा बेदरे, पाचपुते मुकादम,गाडे सरपंच, पिनू पोकळे, अमोल पोकळे , बाळासाहेब सकुंडे, भाऊसाहेब ससे,
तहसीलदार निलावड साहेब,कृषी अधिकारी पवार साहेब ,राख साहेब, विस्तार अधिकारी,ग्राम विकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यासह महेश खेगरे, दादा बेदरे, पाचपुते मुकादम,गाडे यांच्यासह संबंधित कृषि विभाग, महसूल विभाग व बांधकाम विभाग

➡️ वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आंबा, उन्हाळी कांदा, कुकुट पालनाचे शेड,विजेचे खांब कोसळून तारा तुटल्या आहेत वादळाचा वेग मोठा असल्यामुळे जुने मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत प्रशासनाकडून नुकसानीबाबत पंचनामे सुरू झाले आहेत तरीही कोणी वंचित राहू नये म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबतचे फोटो काढून प्रशासनाकडे देण्यात यावेत शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत

सुरेश धस
आमदार
आष्टी

➡️ अन शेतकऱ्याला अश्रू अनावर

पाटोदा तालुक्यातील डागाचीवाडी येथे आ. सुरेश धस नुकसानग्रस्त भागाचे पाहणी गेले असता अण्णा तुम्हीच आमचे आधार असल्याचे भावना व्यक्त करत असताना काल रात्रीचा प्रसंग सांगताना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळणे तर आमदार धस यांनी देखील सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला.

➡️ या गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत

आष्टी व पाटोदा तालुक्यात काल झालेल्या वादळ वाऱ्यामुळे महावितरण विभागाच्या वितरण व्यवस्थेतील सर्व सबस्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.आज सायं.4 वाजेपर्यंत तालुक्यातील 30/11 के.व्ही.दाबाचे आष्टी,पोखरी,आष्टा ह.ना.,जळगाव कडा कारखाना,कडा शहर,वाहिरा, पिंपळा डोईठाण, पारगाव जो, धामणगाव, दौलावडगाव हे सबस्टेशन दुरुस्त झाले आहेत.या सर्व सबस्टेशन चा विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू केला आहे. आष्टी शहर व मुर्शदपूर शहरातील काही भागात विद्युत पुरवठा अद्याप सुरू झालेला नाही. तो उद्या दुपारपर्यंत सुरू होईल असे उपाभियंता देशमुख यांनी सांगितले.
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर,गांधनवाडी, पांढरवाडी डागाचीवाडी, कोतन,उंडेवाडी या गावांसाठी कोतन सबस्टेशन येथुन विद्युत पुरवठा केला जातो.त्या भागात मोठ्या प्रमाणावर विद्युत पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित आहे… तरी पुढील दोन दिवसांमध्ये पोल उभारणी करून विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे उपविभागीय अधिकारी सावकारे साहेब यांनी कळविले आहे.
आ.सुरेश धस यांच्या समवेत बैठक करून महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता बुलबुले,अधीक्षक अभियंता राजपुत , कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी आष्टी तालुक्यातील विद्युत वितरण व्यवस्थेत झालेल्या संपूर्ण नुकसानीची पाहणी करत दिवसभरात प्रत्यक्षपणे फील्ड वरती उभा राहून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!