spot_img
spot_img

आष्टी सह परिसरात वादळवाऱ्यासह पावसाचा कहर ******************************* चक्रीवादळ पावसाळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करा – तहसीलदार वैशाली पाटील

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यासह परिसरात वादळी चक्रीवादळाचे नुकसान या परिसरात झाले असून या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावत वादळ वाऱ्यासह कहर केला आहे.
तात्काळ नुकसानीमुळे उदभवलेल्या परिस्थितीचे पंचनामे करावेत असे आदेश तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिले आहेत.
आष्टी शहर व परिसरात अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळामुळे अनेक भागात अतोनात नुकसान शेतकरी व आष्टी शहर नागरिकांचे झाले असून यामध्ये अनेक ठिकाणी राज्य महामार्ग व राष्ट्रीयमहामार्गावरील मोठं मोठे झाडे मुळा सकट उन्मळून पडलेले असून महावितरण च्या तारासह पोल खाली पडले असून या पडलेल्या पोल व झाडामुळे महामार्गावरील रस्ते बंद पडले होते तर शेतातील शेतीमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तहसीलदार वैशाली पाटील यांनी करत या नुकसानग्रस्त भागाची तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी तात्काळ पंचनामे करावेत असे आवाहन आष्टीचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!