मुंबई (प्रतिनिधी)
‘लेखन शक्तीच्या गुणवत्तेवर समाज व्यवस्थेची भविष्यातील शाश्वत इमारत उभी असते.आष्टी वार्ताहर दीपोत्सव या दिवळी अंकाच्या माध्यमातून वाचकाला सर्वस्पर्शी ज्ञान मिळते असे सांगत सर्व क्षेत्रावर खऱ्या अर्थाने आपल्या भारदस्त लेखणीच्या माध्यमातून नवा अध्याय निर्माण करणारा हा दिवाळी अंक सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी आहे असा गौरव करत मी या अंकाची वाचक आहे अशा शब्दात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री,गायीका केतकी माटेगावकर हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई येथे आज शनिवारी आष्टी वार्ताहर दीपोत्सव या दिवाळी अंकाचे प्रकाशन केतकीच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी तिने हे भाष्य केले. यावेळी संपादक उत्तम बोडखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रातील कलावंताना साहित्यिकांच्या कलागुणांना शब्दबद्ध करत न्याय देण्याच्या भावनेतून गेली ३० वर्षापासून दिवाळीनिमित्त वार्ताहरचा दीपोत्सव हा अंक वाचकांसाठी पर्वणी आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातुन प्रकाशित होणारा आष्टी वार्ताहर ‘दीपोत्सव’ अंक सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारा दर्जेदार दिवाळी अंक असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.मुंबई येथील गोरेगाव फिल्म
सीटीमध्ये प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुभाष पगारे,हनुमंत कावळे,
केतकीची आई सौ.सुवर्णाताई माटेगावकर हे होते.यावेळी संपादक उत्तम बोडखे,संतोष मोटे,आकाश डोंगरे,ओंकार बोडखे हे उपस्थित होते.आष्टी वार्ताहर दीपोत्सव हा दिवाळीनिमित्त प्रकाशित होत असलेला विशेषांक वाचनीय वाटला. राजकीय,
सामाजिक, आर्थिक,धार्मिक,वैचारिक ,
सांस्कृतिक, शैक्षणिक आदींसह विविध क्षेत्रातील कलागुणांना या अंकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे असे सांगीतले.गुणी कलावंत ,
साहित्यिक यांना न्याय आणि सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातून समाजसेवकांच्या कार्याला बळ देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.गेली २९ वर्षांपासून अविरत,सातत्यपूर्ण दिवाळीनिमित्त वार्ताहर दीपोत्सव अंक हा वाचकांना दिला जातो.३० वर्षाची परंपरा असलेल्या पत्रकार उत्तम बोडखे संपादित आष्टी वार्ताहर दिवाळी अंकात विशेष कव्हर स्टोरी,कथा,कविता,विविध विषयांवर लेख ,उपाहासिका आणि प्रसिद्ध व्यंगचित्र आहेत.——–
आष्टी वार्ताहर दिवाळी अंक
बीड जिल्हावाशियांचा आत्मा..
——————————-
३० वर्षाहुन अधिक परंपरा असलेला आष्टी वार्ताहर दिवाळी अंक हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व्यक्त करत विविध क्षेत्रातील वेगळेपण जपणारा आहे.साहित्य लेखकांची यातील लेखणी गुणसंपन्न असल्याने बीड जिल्हावाशियांना ती पर्वणी ठरत आहे.या अंकाची उत्सुकता जिल्हावासियांना लागून राहिली आहे.