कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन तथा कडा किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा.नागेश तात्या कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी पतसंस्थेच्या वतीने कडा शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेला वैकुंठ रथाचे युवा नेते तथा जामगाव चे सरपंच मा.शाम भैय्या धस व ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.कडा शहराील एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानभूमीपर्यत जाण्याचा मार्ग लांब असला तर अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यत पहोचण्यात अनेक अडचणी येत होत्या. जसे की अंतर जास्त असणे,पाऊस चालू असणे या अडचणी कडा येथील शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन नागेश तात्या कर्डिले यांच्या लक्षात आल्या. या अडचणी दुर करण्यासाठी त्यांनी शिवनेरी पतसंस्थेच्या माध्यमातून वैकुंठ रथ बनवला व वाढदिवसानिमित्त त्या वैकुंठ रथाचे लोकार्पण केले. या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत नागेश तात्या कर्डिले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,शाम भैय्या धस, संदिप खाकाळ,सुनिल सुर्यवंशी,रमजान तांबोळी, राजाबापु कर्डिले,संजय ढोबळे,गोरख कर्डिले,संपत सांगळे, उपसरपंच दिपक कर्डिले,सुरेश राठोड, नितीन शिंगवी, योगेश भंडारी, संजय मेहेर, सुनिल गाडे,राजू शिंदे,गणेश कटारिया,राम ससाणे,सुनिल देशमुख, डॉ.नितीन गोरे,केशव चव्हाण, अशोक कर्डिले,युवराज चव्हाण, विठ्ठल मिसाळ,बाळासाहेब पवळ,रहेमान सय्यद,एसबीआय कडा व्यवस्थापक नवनाथ शेळके,वैद्यनाथ बैकेचे सतिष नगरकर पतसंस्थेचे संचालक आप्पासाहेब सांगळे, संदिप कर्डिले, कुंडलिक कर्डिले,संजय कर्डिले,प्रा.कैलास वायभासे, गोकुळ कर्डिले,आयुब मोमीन,श्रीकृष्ण पाटील, महादेव कोकरे,दत्तात्रय सोनवणे सह कडा शहरातील सर्व किराणा व्यापारी, शिवनेरी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत गिलचे, अमोल कर्डिले कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.