पाथर्डी (प्रतिनिधी):- पाथर्डी येथील महाराष्ट्र सुपरफास्ट व दैनिक वीरभूमी चे तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार अनिल खाटेर व हभप अमोल महाराज सोळसे यांना श्रीरामपूर येथील लोककला साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “ पत्रकार भुषण “पुरस्कार व संत ज्ञानेश्वर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १ जुन रोजी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की आमच्या संस्थेच्या वतीने आपली “पत्रकार भुषण ” या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपण अनेक वर्षांपासून करत असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात, सांस्कृतिक, सामाजिक, जनजागृती विषयक कार्याची दखल घेऊन आपणास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकारिता क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर पुरस्कार ह भ प भागवत महाराज मरकड यांना तर सामाजिक क्षेत्रातील समाज भूषण पुरस्कार संभाजीराव बडे तर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कवी रूपचंद शिदोरे यांना जाहीर झाला आहे.
पत्रकार अनिल खाटेर, अमोल महाराज सोळसे व इतरांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.