धामणगाव (प्रतिनिधी) जाटदेवळा या गावांमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सप्तशकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा व श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा आणि गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ह भ प देगलूरकर महाराज यांची काल्याच्या कीर्तनाची सेवा झाली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले की आजच्या या कलियुगातील प्रत्यक्ष देव माणूस म्हणजे मुकुंद काका जाटदेवळेकर आहेत, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा म्हणजे काय? तर महाराजांनी सांगितले की जो व्यक्ती 81 वर्षाचा होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 1000 वेळा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहण्याचा योग येतो त्याला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा म्हणतात, महाराज पुढे बोलताना म्हणाले की मुकुंद काका दोन्ही डोळ्यांनी अंध असून सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी काकांच्या मुखपाट आहे, तुम्ही आम्ही देव पाहिला का माहित नाही पण काकाच्या रूपाने आपण देव पाहिला, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधीला काकाला निमंत्रित केले होते, ह्या पेक्षा तरी गावाचे व आपले काय मोठे भाग्य असते, जाटदेवळा हे गाव तस पाहिलं तर खेड्यातीलच आहे परंतु मुकुंद काकांच्या मुळे जाटदेवळे गावाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात गेले आहे, तुमचं आमचं भाग्य आहे की असा साधू आपल्या गावात जन्माला येतो आणि त्या साधूचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरा होतो, असंच काकावरती व मुकुंद महाराजांवरती आजपर्यंत प्रेम करत आलात तसेच इथून पुढेही करत रहा असे कीर्तनाच्या रुपाने महाराजांनी गावकऱ्यांना आवाहन केले. गावातील तरुण वर्गाने या सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले,यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती,
💥💥💥💥💥💥💥💥💥💥
तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका, आई-वडिलांचा सांभाळ करा, माझा हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा तुम्ही मोठ्या आनंदामध्ये साजरा केला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढेच कमी आहेत, एकजुटीने रहा, जाटदेवळा गावाने आत्तापर्यंत खूप सहकार्य केलं त्या सहकार्याचा मी आयुष्यभर ऋणी राहील……….
ह.भ.प. प्रज्ञाचक्षु मुकुंद काका जाटदेवळेकर