अहिल्यानगर(प्रतिनिधी)स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रांतर्गत राबविलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व संजीवनी फाउंडेशनच्या सीएससी केंद्राकडून करून घेतल्याबद्दल संजीवनी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक अमोल नारायणराव जवणे हे प्लॅटिनम पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत .
संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयातर्फे आयोजित
“फास्टेस्ट फिफ्टी एप्रिल २०२५” कम्पेन अंतर्गत श्री.अमोल नारायणराव जवने यांचा उत्कृष्ट बी.सी. प्लॅटिनम प्रवर्ग म्हणून डी. जी. एम.श्री.चंद्रशेखर राच्या,विभागीय कार्यालय यांचे हस्ते पुरस्कार प्रदान केला तसेच छ.
संभाजी नगर ,श्री.अतुल सावजी मुख्य प्रबंधक (वि.स), श्री. अमोल चावरे, प्रबंधक(वि. स.) अहिल्यानगर क्षेत्रीय कार्यालय हे पण कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. सामाजिक सुरक्षा योजना जसे अटल पेन्शन योजना, प्रधान मंत्री जीवन सुरक्षा ,जीवन ज्योती योजना अशा अनेक योजना अनेक वर्षा पासून घराघरात पोहोचवल्या आणि त्यांना लाभ मिळवून तसेच अनेक ग्राहक सेवा केंद्राचे वाटप करून त्याचा मोठा वटवृक्ष केला, याबाबत श्री. अमोल जवने यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. यांच्या काम तथा योगदानापासून CSP नी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन श्री.अमोल चावरे, प्रबंधक(वि. स.) यांनी केले.
देशातील बहुतेक गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नागरिकांना बँकिंग सेवा मिळण्यासाठी दूरवर जावे लागत आहे म्हणून आपल्याच गावात त्वरित बँकिंग सेवा मिळावी बेरोजगारांना काम मिळावे नागरिकांचा वेळ वाचवा व आपले रोजचे काम न नडता व्यवहार करता यावा हाच ग्राहक सेवा केंद्राचा मुख्य उद्देश आहे नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपले उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत त्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा एक चांगला पर्याय उपलब्ध असून या संधीचा फायदा घ्यावा जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वाधिक ग्राहक सेवा केंद्र असून पुढील काळात एक गाव एक ग्राहक सेवा केंद्र हे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे अधिक माहितीसाठी साई एजन्सी(९२२६०९५९४८) प्लॉट नंबर 16 अंकुर आपारमेंट दुर्गा माता मंदिराजवळ, रासने नगर, सावेडी अहिल्यानगर येथे संपर्क साधावा असे जिल्हा समन्वयक अमोल जवणे यांनी सांगितले