अहिल्यानगर(प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र गाडीलोहार समाज विकास महासंघ, प्रणित,लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व पदोन्नती मिळालेले समाजाचे अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त उद्योजक यांचा सत्कार व लोहार शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या निबंधलेखन स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभ रविवारी, २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल द व्हाईटहाऊस कोहिनूर मॉल शेजारी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती कावरे, महासंघाचे अध्यक्ष सदाशिवराव हिवलेकर , महासंघाचे सचिव प्रा. डॉ.एस . के. पोपळघट, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील १०वी १२वी बोर्ड परीक्षेतील, स्कॉलरशिप व इतर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी लोहार शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष प्राचार्य सुभाष कौसे, सामाजिक कार्यकर्ते वलोहार शिक्षण परिषदेचे उपसचिव प्रा.हर्षल आगळे (98223 35592) यांच्याशी संपर्क साधावा.