spot_img
spot_img

लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कडा (प्रतिनिधी) कडा येथील वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल या सी. बी. एस. ई. बोर्ड मान्यताप्राप्त शाळेचा १००% निकाल लागला असून शाळेतील प्रणव कासवा – ९५.४०% प्रथम क्रमांक , शर्विल भळगट – ९५.२०% द्वितीय क्रमांक, आयुष मुनोत – ९४.२०% तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर 13 विद्यार्थ्यांनी ८० % पेक्षा जास्त गुण संपादन करून विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष- श्री.अमितजी राठोड, उपाध्यक्ष – श्री. संदीपजी चानोदिया, सचिव – श्री. हेमंतजी मेहेर, कोषाध्यक्ष – डॉ. प्रमोदजी भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी श्री.मनीषजी गांधी, श्री. प्रकाशजी श्रीश्रीमाळ, श्री. अमोलजी पटवा,श्री संजयजी पितळे, श्री.संतोषजी गांधी, मुख्याध्यापक – के. अभिलाष , सल्लागार – पी.जी. मेहेर सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!