आष्टी ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावी चा निकाल जाहीर करण्यात आला आहे याही वर्षी सौ. लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान सावेडी अहिल्यानगर संचलित अडबंगीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय कारखेल खु. ता. आष्टी जि. बीड या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा ही कायम ठेवली आहे आणि दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे . बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थी प्रथम वाणी सुमित विकास ८५.८३% ,द्वितीय खाडे तुषार अंकुश ८३.५०% ,तृतीय दहातोंडे शुभम रावसाहेब ८१.००% ,चतुर्थ वनवे अदिती नारायण ८१.००% तर दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रथम सुप्रिया सिकंदर गव्हाणे ९०.००%, द्वितीय प्रेरणा सतीश राजगुरू ८६.४० %,तृतीय ऋतुजा नवनाथ गव्हाणे ८५.४०% असे आहेत.दहावी बारावी च्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक श्री. बापूसाहेब डोके यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून श्री बापूसाहेब डोके साहेब म्हणाले की कोणतीही सुरुवात करताना शुभेच्छांची गरज असते माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्याबरोबर असतील असेच यशाचे शिखर गाठा आयुष्य आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे आयुष्याचे नवे धडे गिरवण्यासाठी तुम्ही आता सज्ज होणार आहात दहावी बारावी ही यशाची पहिली पायरी आहे यशाची पहिली पायरी पार केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच आपल्या विद्यालयाचे नाव मोठे करा आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा तसेच शाळेच्या व कॉलेजच्या विषय प्राध्यापकांचे व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन .