देवळाली (वार्ताहर) आष्टी तालुक्यातील देवळाली येथील शेतकरी सतीश तांदळे यांचा मुलगा सिद्धेश हा नेवासा तालुक्यातील दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील या विद्यालयामध्ये शिक्षण घेत होता त्याने दहावी मध्ये 96.40% गुण घेऊन573 विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे
सिद्धेश चे प्राथमिक शिक्षण देवळाली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आहे.
सिद्धेश च्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. तो लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे.त्याच्या या यशामागे त्याची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सिद्धेश ने सांगितले. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व सामाजिक ,राजकीय, शैक्षणीक स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकवृंदांनी त्याचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.